Join us

'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:24 IST

'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात मीना कुमारींची भूमिका साकारण्यासाठी 'या' अभिनेत्रीला साईन करण्यात आले आहे.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा सिनेमा बनवणार आहे.  'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात मीना कुमारींची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री कियारा अडवाणी फायनल झाल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वीच कियाराने लेकीला जन्म दिला. आई झाल्यानंतर तिने आपला पहिला सिनेमा साईन केला आहे अशी बातमी बीटाऊनमध्ये पसरली आहे.

कियारा अडवाणी दशकभरापासून या इंडस्ट्रीत काम करत आहे. मीना कुमारी यांच्या भूमिकेसाठी ती देखील खूप उत्साहित आहे. मिड डे रिपोर्टनुसार, निर्माते बिलाल अमरोही यांच्या या सिनेमात मीना कुमारी आणि त्यांचे पती कमल अमरोही यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. १९७२ साली त्यांनी 'पाकिजा' सिनेमा बनवला होता. कियारामध्ये तो चार्म आणि भावनिक सौंदर्य आहे जे पडद्यावर नक्कीच उतरेल. कियारा या भूमिकेसाठी घरीच तयारी करत असून ऊर्दूही शिकत आहे. 

दरम्यान, या भूमिकेसाठी आधी क्रिती सेननच्याही नावाची चर्चा होती. क्रिती आणि कियारामध्ये या भूमिकेसाठी चढाओढ होती. दोघींनी एकाच वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तसंच आपापलं वेगळं स्थानही निर्माण केलं आहे. दरम्यान आता मीना कुमारी यांच्या बायोपिकसाठी कियारा अडवाणीने बाजी मारली आहे. अद्याप यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

कियारा अडवाणीने यावर्षी १५ जुलै रोजी लेकीला जन्म दिला. सिद्धार्थ आणि कियारा या जोडप्याने अद्याप आपल्या लेकीचं नाव जाहीर केलेलं नाही. आई झाल्यानंतर पहिल्यांदा कियाराने दिवाळीची पोस्ट शेअर केली होती ज्यात ती पुन्हा फिट दिसत आहे. चाहत्यांना त्यांच्या लेकीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kiara Advani to star in Meena Kumari biopic, replacing Kriti?

Web Summary : Kiara Advani is reportedly finalized to play Meena Kumari in an upcoming biopic produced by Manish Malhotra. The film, focusing on Meena Kumari and Kamal Amrohi's relationship, has Kiara learning Urdu to prepare. Kriti Sanon was also considered for the role.
टॅग्स :मीना कुमारीकियारा अडवाणीबॉलिवूडआत्मचरित्र