Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे हवाई दलाने मला अपात्र ठरवलं, अमिताभ बच्चन यांनी सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 12:00 IST

बिग बींची उंची सहा फुटांपेक्षा जास्त आहे. याच उंचीमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली असली तरी एकेकाळी त्यांनी उंचीमुळे स्ट्रगल देखील केला. 

बॉलिवूडचे 'महानायक' अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांचे देशातच नाही तर परदेशातही चाहते आहेत. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपटही दिले आहेत. आजही अमिताभ बच्चन लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. अमिताभ बच्चन यांचं नाव घेतलं कि समोर येते ती त्यांची उंची. बिग बींची उंची सहा फुटांपेक्षा जास्त आहे. याच उंचीमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली असली तरी एकेकाळी त्यांनी उंचीमुळे स्ट्रगल देखील केला आहे. 

आता नुकत्याच झालेल्या केबीसीच्या भागामध्ये त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अमिताभ यांना सुरुवातीला हवाई दलात काम करायचे होते, पण  पण नशिबाला ते मान्य नव्हते. ते स्वप्न सोडून त्यांना इंडस्ट्रीत पाऊल ठेवावं लागलं होतं, असा खुलासा त्यांनी केला. 

केबीसीच्या मंचावर एक स्पर्धकाने एअरफोर्समध्ये जॉईन होण्याचे स्वप्न सांगितल्यावर अमिताभ बच्चन यांना स्वतःचे स्वप्न आठवलं.  बिग बी म्हणाले, "जेव्हा मी माझे शालेय शिक्षण पूर्ण केले. तेव्हा मला पुढे काय करावे हे समजत नव्हते. मी माझ्या कुटुंबासह दिल्लीत राहत होतो आणि माझ्या घराजवळ लष्कराचा एक मेजर जनरल राहत होते". 

पुढे ते म्हणाले, "एकदा ते आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना मला लष्करात पाठवायला सांगितले. जेणेकरून मी आर्मीमध्ये मोठा अधिकारी होऊ शकेन. मला एअरफोर्समध्ये जॉईन व्हायचे होते, पण तसे काहीही झाले नाही. जेव्हा मी मुलाखतीसाठी गेलो. तेव्हा माझे पाय खूप लांब आहेत आणि मी हवाई दलासाठी पात्र नाही, असे सांगून त्यांनी मला नाकारलं". बिग बी यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून उपस्थितांना चांगलेच आश्चर्य वाटले. 

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटीहवाईदल