Join us

तर 'या' अभिनेत्यासोबत काम करायचे नाही कॅटरिना कैफला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 10:31 IST

अभिनेत्री कॅटरिना कैफने आपला खास मित्र आणि को-स्टारसोबत काम करायला नकार दिला आहे.

ठळक मुद्देकॅटरिना शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात दिसणार आहे

अभिनेत्री कॅटरिना कैफने आपला खास मित्र आणि को-स्टारसोबत काम करायला नकार दिला आहे. तुम्ही विचार करत असला आम्ही रणबीर कपूर बद्दल बोलतोय तर नाही कॅटरिनाने रणबीर नाही तर आदित्य रॉय कपूरसोबत काम करण्यास नकार दिला आहे. एक वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, कॅटरिनाला एका रोमाँटिक कॉमेडी सिनेमाची ऑफर आली होती, त्यात आदित्य रॉय कपूरदेखील होता. मात्र कॅटरिनाने त्यात फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. रिपोर्टनुसार कॅटरिना आणि आदित्य खूप चांगला मित्र आहेत. कॅटला आता पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करायची नाहीय. 

कॅटरिनाने आदित्यसोबत काम करण्यास नकार देण्यामागचे कारण चित्रपट 'फितूर' असल्याचे बोलले जातेय.'फितूर'मध्ये आदित्य आणि कॅटरिनाची जोडी होती मात्र हा चित्रपट फ्लॉप झाला होता. कॅटरिनाचा रणबीर सोबत आलेला जग्गा जासूस आणि फितूर दोनही बिग बजेट चित्रपट फ्लॉप गेले होते. त्यामुळे कॅटरिना आता ताकसुद्धा फुकून पितेय. कॅटरिनाशेवटची सलमान खानसोबत 'टायगर जिंदा है'मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट गेला होता. यानंतर कॅटला शाहरुख खानचा 'झिरो' आणि आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ला मिळाला. दोनही चित्रपट कॅटरिनाला सलमान खानमुळे मिळाल्याचे बोलले जातेय.      

कॅटरिना शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात दिसणार आहे. यात अनुष्का शर्माची ही महत्त्वाची भूमिका आहे. शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. ख्रिसमला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच कॅटरिना विक्रम बत्रा यांच्या बायोपिकमध्ये सुद्धा दिसू शकते. या सिनेमाचे नाव 'शेर शाह' ठेवण्यात आले आहे. यात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे.    

टॅग्स :कतरिना कैफसलमान खान