२०१२ साली बर्फी (Barfi) हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटत रणबीर कपूर (Ranbir Kapoor), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि इलियाना डिक्रुझ (Ileana D'cruz) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. अनुराग बसू (Anurag Basu) दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या वेळी फारशी कमाई केली नाही परंतु कालांतराने या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि आजही या सिनेमाच्या कथानकासह गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
दिग्दर्शक अनुराग बसूने एका मुलाखतीत सांगितले होते की, बर्फी चित्रपटाची कथा दोन मुलींभोवती फिरते. अनुरागला कतरिना कैफला या चित्रपटात कास्ट करायचे होते. मात्र, काही कारणांमुळे तिने सिनेमात काम करण्यास नकार दिला. इलियाना डिक्रूझने या चित्रपटात श्रुती घोषची भूमिका साकारली होती. ही भूमिका कतरिनाने करावे अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. इलियानाच्या व्यक्तिरेखेने देखील चित्रपटाचे वर्णन केले असल्याने, चित्रपटाच्या कथनकात कतरिनाचा आवाज असावा अशी त्यांची इच्छा होती.
अनुराग बसूने 'बर्फी'ची कथा कतरिनाला सांगितली होती. मात्र नंतर अभिनेत्रीने या चित्रपटाची ऑफर नाकारली, कारण तिला खात्री नव्हती की तिची भूमिका दोन नायिकांसह चित्रपटात चमकू शकेल. नंतर ही भूमिका इलियाना डिक्रूझला ऑफर करण्यात आली. याशिवाय, इलियानाने साकारलेल्या भूमिकेची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने त्याच्या आईकडून प्रेरणा घेतली होती. त्याची आई जशी त्याला तयार करायची तशीच तयारी त्याने केली होती. चित्रपटातील अनेक दृश्ये चार्ली चॅप्लिनच्या काळातील चित्रपटांपासून प्रेरित होती.
कतरिना आणि रणबीरने एकत्र या सिनेमात केलं काम'बर्फी' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. ८५ अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनी अनुराग बासूने पुन्हा एकदा कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांना मोठ्या पडद्यावर एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. यावेळी चित्रपट होता 'जग्गा जासूस'. दोघेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. प्रदीर्घ शेड्यूलनंतर हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती रणबीर कपूरनेच केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.