Join us

katrina kaif : सांग तू असं का केलंस? कतरिना कैफचा बदललेला चेहरा पाहून सोशल मीडियावर सुरू झाली भलतीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 15:51 IST

katrina kaif : कतरिना कैफ सध्या ‘फोन भूत’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमात कॅट भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण सध्या कतरिनाबद्दल सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा सुरू झालेली दिसतेय.

Did Katrina kaif Underwent Plastic Surgery Fan Trolled: कतरिना कैफ (katrina kaif) सध्या ‘फोन भूत’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमात कॅट भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण सध्या कतरिनाबद्दल सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा सुरू झालेली दिसतेय. काही दिवसांआधी कतरिना ‘बिग बॉस 16’मध्ये प्रमोशन करताना दिसली. पण यावेळचा कतरिनाचा लुक पाहून अनेकजण हैराण झालेत. मग काय?सोशल मीडियावर काही लोकांनी कतरिनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘बिग बॉस 16’मध्ये कतरिनाने सलमानसोबत स्टेज शेअर केला.

पिवळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिने हजेरी लावली. पण तिचा लुक नेटकऱ्यांना फार काही आवडला नाही. अनेकांना खटकला तो कतरिनाचा चेहरा. होय, कतरिनाचा चेहरा पाहून अनेकांनी तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचा दावा केला. अनेकांनी यावरून तिची मजा घेतली. तिची खिल्ली उडवली.काहींनी कतरिनाचा जुना व आत्ताचा फोटो शेअर करत, तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

‘प्लास्टिक सर्जरी करून कतरिनाने आपल्या सुंदर चेहऱ्याची वाट लावली, कतरिना तू असं का केलंस?’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘म्हणायला नको, पण केमिकलचा वापर करून कतरिनाने तिचं सौंदर्य हरवलं आहे. आता ती अगदीच वयस्कर व विचित्र दिसू लागली आहे,’ असं मत अन्य एका चाहत्याने व्यक्त केलं.

कतरिनाच्या ‘फोन भूत’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर लीड रोलमध्ये आहेत. जॅकी श्रॉफ यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवायकतरिनाकडे टायगर 3,  जी ले जरा, मेरी क्रिसमस हे बिग बजेट सिनेमे आहेत.

टॅग्स :कतरिना कैफबॉलिवूड