कतरिना कैफने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून कतरिना फेमस आहे. कतरिनाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच रंगते आणि त्यातही ती तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मात्र तिच्या फॅशन सेन्समुळे ती अनेकदा ट्रोलिंगची देखील शिकार होते. यावेळीही असेच घडले जेव्हा अभिनेत्रीने स्वत: चा स्वेटर घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
स्टाईल आयकॉन कतरिना कैफने निळ्या रंगाचे स्वेटर घातलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत कॅट खूपच क्युट दिसत होती. मात्र तरीही हा फोटो शेअर केल्यानंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. या क्रॉप स्वेटरसोबत तिने जीन्स घातली होती. तिने टॉपशिवाय सरळ स्वेटर घातला आणि सेफ्टी पिनच्या मदतीने स्वेटरच्या दोन्ही बाजूंना पिनअप केले होते.
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, कतरिना सध्या उदयपुरमध्ये 'फोन बूथ'चे शूट करतेआहे. या चित्रपटात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील आहेत. यानंतर मार्चमध्ये ती इस्तंबूलमध्ये सलमान खानसोबत 'टायगर 3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.