Join us

कतरिना कैफच्या बहिणीने म्युझिक व्हिडीओत केलं डेब्यू, सलमान म्हणाला - अरे वाह इसाबेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 15:53 IST

इसाबेलच्या पंजाबी 'माशाल्लाह' गाण्याचा व्हिडीओ रिलीज झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इसाबेलच्या सुंदरतेचं लोक कौतुक करत आहेत.

अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या डान्सने, अदांनी तिने अनेकांना आपल्या प्रेमात पडालं आहे. आज तिने बॉलिवूड आपली वेगळी जागा निर्माण केली. आपल्या अ‍ॅक्टिंगसोबतच कतरिना आपल्या सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत राहते. आता तिची लहान बहीण इसाबेल कैफनेही मोठ्या बहिणीच्या पावलावर पाउल देत एका म्युझिक व्हिडीओमध्ये डेब्यू केलंय. इसाबेलच्या पंजाबी 'माशाल्लाह' गाण्याचा व्हिडीओ रिलीज झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इसाबेलच्या सुंदरतेचं लोक कौतुक करत आहेत.

इसाबेल कैफच्या या पंजाबी गाण्याचा व्हिडीओ अभिनेता सलमान खानने त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केलाय. सोबतच इसाबेलचं कौतुक करत सलमान म्हणाला की, 'अरे वाह इसाबेल, हे गाणं फार चांगलं आहे आणि तू सुद्धा फार सुंदर दिसत आहे. खूप शुभेच्छा'.

'माशाल्लाह' हे गाणं पंजाबी गायिका डीप मनीने गायलं आहे. या गाण्यातील इसाबेलच्या हॉट आणि ग्लॅमरस अंदाजाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. या व्हिडीओला यूट्यूबवर आतापर्यंत २१ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.  

दुसरीकडे सलमान खानने हा व्हिडीओ शेअर केल्याने या हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर सलमान खान प्रभुदेवाच्या 'राधे : युअर मोस्ट वॉंटेड भाई' सिनेमात दिसणार आहे. किक २ आणि कभी ईद कधी दिवाली हेही सिनेमे येणार आहेत. सोबतच तो शाहरूख खानच्या 'पठाण' सिनेमातही कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :इसाबेल कैफकतरिना कैफसलमान खान