Join us

उदयपूरमध्ये 'फोन भूत'ची शूटिंग करतेय कतरिना कैफ, आपल्या गँगसोबत शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 17:04 IST

कतरिनाने सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या आगामी हॉरर कॉमेडी 'फोन भूत'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे आणि. तिने तिचे नवे सहकलाकार अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. कतरिनाने सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती सिद्धांत आणि ईशानसोबत पोज देताना दिसते आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग उदयपूरमध्ये सुरु आहे. उदयपुरमधील  एका सरोवराच्या काठावर हे तिघे एन्जॉय करताना दिसतायेत. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे तर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी निर्मिती केली आहे. वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर कतरिना रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. .सूर्यवंशी हा चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. २०२१ मध्ये सूर्यवंशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

अली अब्बास जफरच्या सुपरहीरो सीरिजमध्ये देखील ती झळकणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. याशिवाय कतरिना कैफ सलमान खानसोबत ‘एक था टायगर’च्या तिसºया पार्टमध्ये सुद्धा दिसणार आहे.

टॅग्स :कतरिना कैफ