Join us

म्हणून कतरिना कैफ जाणार नाही तिच्या एक्सच्या लग्नाला, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 16:03 IST

सध्या कतरिना कैफ तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा 'भारत'ला घेऊन चर्चेत आहे. 'भारत'मध्ये तिने केलेल्या अभिनयाचे कौतूक होतंय.

ठळक मुद्देरणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर कतरिना कैफ काहीशी खचली होतीकॅटने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती

सध्या कतरिना कैफ तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा 'भारत'ला घेऊन चर्चेत आहे. 'भारत'मध्ये तिने केलेल्या अभिनयाचे कौतूक होतंय. रणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर कॅटरिना कैफ काहीशी खचली होती. ती वेळ तिच्यासाठी सगळ्यात कठीण होती. नुकतीच कॅटने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती.  

कतरिनाचा एक्स बॉयफ्रेड रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाच्या विषयावर तिथं चर्चा झाली ऐवढेच नाही तर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाबाबत देखील डिसक्शन झाले. कॅटला नेहाने विचारले, तुला कुणाच्या लग्नात जायला आवडेल. यावर कॅटने आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले.   

कॅट म्हणाली, मला अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाला जायला आवडेल. याच कारण तिला विचारण्यात आले यावर ती म्हणाली, मी अर्जुनला राखी बांधते. त्यामुळे मला त्याच्या लग्नाला जाणार. 

काही दिवसांपूर्वीच रणबीरने जुने अपार्टमेंट विकले आहे. या घरात तो कॅटसोबत रिलेशनशीपमध्ये असताना राहिला होता. ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफने नवीन अपार्टमेंट घेतले आणि ती तिथे राहू लागली  तर रणबीरने हे अपार्टमेंट  विकले. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सध्या कतरिना भारतचे सक्सेस एन्जॉय करतेय. लवकरच ती अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात देखील झाली आहे. 

टॅग्स :कतरिना कैफरणबीर कपूरआलिया भट