Join us

रणबीरचा अ‍ॅनिमल तर काहीच नाही, त्याहून क्रूर कार्तिक आर्यन-अक्षय खन्नाच्या सिनेमाची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:58 IST

कोण दिग्दर्शित करणार सिनेमा?

अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) आगामी सिनेमांमध्ये अनुराग बसूंचा एक सिनेमा आहे. अभिनेत्री श्रीलीलासोबत त्याची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. यानंतर तो करण जोहरच्या 'तू मेरी मै तेरा मै तेरी तू मेरा' सिनेमात तो अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. सध्या कार्तिक आर्यन सर्वच मेकर्सचा लाडका आहे. त्याच्याकडे सिनेमांची रांग आहे. आता त्याच्या हाताला एक मोठी अ‍ॅक्शन फिल्मही आली आहे. रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'पेक्षाही हा सिनेमा खतरनाक असणार आहे.

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाईडनुसार, टीसीरिज सध्या एक मॅसिव्ह पॅन इंडिया अॅक्शन सिनेमा बनवायचा विचार करत आहे. सोबतच यामध्ये कार्तिक आर्यनला मुख्य अभिनेता म्हणून घेण्याची योजना आहे. सिनेमा खलनायकाच्या रुपात अक्षय खन्ना दिसू शकतो. राजकुमार पेरियासामी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी 'आमरन' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. दरम्यान कार्तिक आर्यन आणि अक्षय खन्नाला लॉक करण्यात आलं आहे. 

हा एक डार्क आणि दमदार सिनेमा असणार आहे. रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'च्याच पठडीतला हा सिनेमा असेल. त्यापेक्षाही हिंसक, क्रूर सीन्स या सिनेमात दिसणार आहेत. प्रेक्षकांसाठी एक नवा सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. कार्तिक आर्यन आणि अक्षय खन्ना आमनेसामने असणार आहेत. यासाठी दोघांना एक्स्टेंसिव्ह ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्यांना कमालीचं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करावं लागणार आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनअक्षय खन्नाबॉलिवूड