Join us

'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 18:37 IST

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणी रियाची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. त्यानंतर अखेर आज तिला अटक करण्यात आली आहे. रियाची रविवारी सहा तास आणि सोमवारी आठ तास चौकशी करण्यात आली. रियाचा भाऊ शोविकला आधीच अटक करण्यात आली आहे. 

रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, योगायोगाने काहीच होत नाही. तुमचे कर्मच तुमचे नशीब ठरवते. 

"ही तर एका ड्रग अॅडिक्ट आणि मानसिक आजार असलेल्या व्यक्तीशी प्रेम केल्याची शिक्षा"

रियाला अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने ट्विटरवर लिहिले की, देव आमच्या सोबत आहे.

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहे. आज अंकिताने सुशांतची बहिण श्वेता सिंगचे ट्विट रिट्विट करत लिहिले की, आम्ही सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबासोबत आहोत.

‘सॉरी बाबू’! रियाच्या अटकेनंतर सुशांतचे चाहते झालेत अ‍ॅक्टिव्ह; ट्विटरवर मजेदार मीम्सचा पूर

अंकिता सातत्याने सोशल मीडियावर जस्टिस फॉर एसएसआर लिहते आहे. तिने रिया चक्रवर्तीने केलेले दावे देखील फेटाळून लावले ज्यात रिया म्हणाली होती की सुशांत डिप्रेशनला बळी पडला होता.

टॅग्स :अंकिता लोखंडेरिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतकंगना राणौत