Join us

करीश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा!, हनीमूनला नवऱ्याने तिला मित्राच्या खोलीत सांगितले झोपायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 21:45 IST

एका मुलाखतीदरम्यान करीश्माने तिच्यासोबत घडलेला किळसवाणा प्रकार सांगितला. जे ऐकून सर्वजण हैराण झाले.

बॉलिवूडची लोलो म्हणजेच अभिनेत्री करीश्मा कपूर बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसली तरी एकेकाळी तिने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर राहणेच पसंत केले होते. करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले होते. आता मात्र तिने त्याला घटस्फोट दिला आहे. ती तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटीच करते आहे.एका मुलाखतीदरम्यान करीश्माने तिच्यासोबत घडलेला किळसवाणा प्रकार सांगितला. 

करीश्मा कपूरने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, तिचे लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य खूपच भयानक होऊन गेले. लग्नानंतर फक्त तिचा नवरा म्हणजेच संजय कपूरच नव्हे तर तिच्या सासरची मंडळी तिचा छळ करत होते.

करीश्मा म्हणाली की, जेव्हा ती आणि संजय हनिमूनला गेले होते तेव्हा संजयने त्याच्या काही मित्रांसोबत करिश्माचा सौदा केला होता. करिश्माने सांगितले की संजयने तिला संपूर्ण एक रात्र त्याच्या मित्रांसोबत व्यतित करायला लावली. जेव्हा ती या गोष्टीसाठी तयार झाली नाही तेव्हा त्याने तिला खूप मारहाण केली होती.

याशिवाय करीश्माने हे देखील सांगितले की सासरी तिच्या सासूसोबत तिचे पटत नव्हते. तिची सासू तिच्यावर कोणत्याही गोष्टीवरून हात उचलायची.‌ एवढेच नाही तर संजय त्याच्या भावाला करिश्माच्या पाळतीवर ठेवले होते. तसेच संजय लहान-सहान गोष्टींवरून हायपर व्हायचा आणि तिला मारायचा. करिश्माने सतरा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३ ला बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते. या दोघांनी प्रेमविवाह केला होता मात्र त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही. लग्नानंतर पाच-सहा वर्षातच त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनीही नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर करीश्मा तिची आई बबिताकडे राहू लागली. अखेर २०१६ या दोघांनी घटस्फोट घेतला. रिपोर्टनुसार या दोघांनी आपापसातील सामंजस्याने घटस्फोट घेतला होता. संजयने पोटगी म्हणून करिश्माला १० कोटी रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या संजय त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्चसुद्धा करतो आहे.

करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जुडवा, राजा बाबू, हिरो नंबर १, राजा हिंदुस्तानी, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ है अशा बऱ्याच सिनेमात तिने काम केले आहे. बॉलिवूडपासून खूप काळ लांब राहिल्यानंतर करीश्माने काही महिन्यांपूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्म मधून कमबॅक केला आहे. ती मेंटलहूड या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसली.

टॅग्स :करिश्मा कपूर