बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर(Karisma Kapoor)चा एक्स पती संजय कपूर (Sunjay Kapoor) यांच्या मृत्युपत्रावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या अचानक निधनानंतर, त्यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून त्यांच्या आई आणि पत्नीमध्ये आधीच वाद सुरू होता. आता करिश्मा आणि संजय यांच्या मुलांनीही सावत्र आई प्रिया कपूरवर फसवणुकीचा आरोप केला आहे.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांची मुले समायरा कपूर आणि किआन कपूर यांनी त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेसंदर्भात न्यायालयात धाव घेतली आहे. समायरा आणि किआन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे, ज्यात २१ मार्च २०२५ रोजीच्या मृत्यूपत्राला त्यांनी संशयास्पद, बनावट आणि खोटे म्हटले आहे.
सर्व मालमत्ता फ्रिज करण्याची केली मागणीकरिश्मा कपूरच्या मुलांनी याचिकेत प्रिया कपूरवर आरोप केला आहे की, तिने संजय कपूरचे मृत्युपत्र ७ आठवडे लपवून ठेवले. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत समायरा आणि किआन यांनी वडील संजय कपूर यांच्या संपत्तीमध्ये प्रत्येकी २०% वाटा मागितला आहे. यासोबतच, त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात वाद मिटेपर्यंत सर्व मालमत्ता फ्रिज करण्याची मागणी केली आहे.
१२ जूनला झाला संजय कपूर यांचा मृत्यू१२ जून २०२५ रोजी यूकेमध्ये संजय कपूर यांचा अचानक मृत्यू झाला होता. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला की पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. संजय कपूर यांच्या निधनानंतर एका आठवड्याने दिल्लीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यात करिश्मा कपूर आपल्या मुलांसोबत सहभागी झाली होती.
प्रॉपर्टीवरून वादसंजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या प्रॉपर्टीवर त्यांच्या आई, बहिणी आणि पत्नी प्रिया सचदेव यांच्यातही वाद सुरू आहे. मंदिराने एएनआयशी बोलताना प्रियावर आरोप केले होते की, तिने बंद दाराच्या मागे तिच्या आईकडून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या आहेत.