Join us

करिना कपूरने माझ्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये करावे काम ही आहे करिश्मा कपूरची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 19:45 IST

करिना आणि करिश्मा या दोघी कितीही कामात व्यग्र असल्या तरी एकमेकींसाठी वेळ काढतात. तसेच अनेक वेळा एकत्र फिरायला देखील जातात. करिना आणि करिश्मा यांच्या या बॉण्डिंगबाबत नुकतेच करिश्माने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

ठळक मुद्देकरिश्माला या मुलाखतीत तुझ्या कोणत्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये करिनाने काम करावे असे तुला वाटते असे विचारण्यात आले होते. त्यावर करिश्माने क्षणाचाही विलंब न लावता बिवी नं १ या चित्रपटाचे नाव घेतले. 

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांच्या करिश्मा कपूर आणि करिना कपूर या मुली आहेत. त्या दोघींनी आपल्या पालकांप्रमाणे बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. करिश्मा आणि करिना या दोन बहिणी अनेक पार्टींमध्ये, समारंभात नेहमीच एकमेकींसोबत दिसतात. त्यांच्यामध्ये ट्युनिंग खूपच चांगले आहे. त्या दोघी कितीही कामात व्यग्र असल्या तरी एकमेकींसाठी वेळ काढतात. तसेच अनेक वेळा एकत्र फिरायला देखील जातात. करिना आणि करिश्मा यांच्या या बॉण्डिंगबाबत नुकतेच करिश्माने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

करिश्मा आणि करिना या दोघी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. करिश्माने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बिवी नं. १, राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी तर तिला पुरस्कार देखील मिळाले आहेत तर करिना ही आज बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री असून तिचे चित्रपट म्हटले की ते हीट होणारच असेच म्हटले जाते. करिनासोबतच्या बॉण्डिंगविषयी करिश्मा सांगते, आम्ही दोघी एकमेकांच्या नेहमीच पाठिशी उभ्या असतो. आम्ही दोघी एकमेकांच्या खूपच जवळ असून दोघींची गुपिते देखील एकमेकींना माहीत असतात. आम्ही अनेक गोष्टींवर गप्पा मारतो. 

करिनाचा आगामी चित्रपट कधी येणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. करिश्माला या मुलाखतीत तुझ्या कोणत्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये करिनाने काम करावे असे तुला वाटते असे विचारण्यात आले होते. त्यावर करिश्माने क्षणाचाही विलंब न लावता बिवी नं १ या चित्रपटाचे नाव घेतले. 

बिवी नं १ या चित्रपटात करिश्मासोबतच सलमान खान, अनिल कपूर, तब्बू आणि सुश्मिता सेन यांच्या मुख्य भूमिका होत्या. आपल्या पतीचे त्याच्याच कंपनीच्या एका मॉडेलसोबत अफेअर सुरू आहे हे कळल्यानंतर आपल्या पतीला धडा शिकवणाऱ्या पत्नीची भूमिका या चित्रपटात करिश्माने साकारली होती. हा चित्रपट त्या काळात चांगलाच गाजला होता. 

टॅग्स :करिश्मा कपूरकरिना कपूर