Join us

ही अभिनेत्री म्हणते Ready For Summer, फोटो पाहून नेटीझन्स म्हणाले Beauty With Class

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:33 IST

करिश्माने वेबसिरिद्वारे अभिनय क्षेत्रात कमबॅक केल्यानंतर आता ती लवकरच सिनेमात झळकेल अशी आशा करायला हरकत नाही. करिश्मा आणि करिना या दोघी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

 90च्या दशकात करिश्मा कपूर ही आघाडीची अभिनेत्री होती. काही काळानंतर तिनेही दिल्लीतील संजय कपूर या व्यावसायिकासह लग्न करत सेटल झाली होती. मात्र काही कारमामुळे हे नातेही फार काळ टिकले नाही. परिणामी दोघेही वेगळे झाले. या दोघांना दोन मुलंही आहेत. आज करिश्मा सिंगल मदर बनत आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे. तर सोशल मीडियावर ती आपले एक से बढकर एक फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने राजा बाबू, अंदाज अपना अपना, कुली नं १, राजा हिंदुस्तानी, जुडवा, दिल तो पागल है, बिवी नं १ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

२००६ मध्ये करिश्माने मेरे जीवन साथी या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर अनेक वर्षं ती अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली. तिने डेन्जर्स इश्क या चित्रपटाद्वारे काही वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. मात्र गेल्या सात वर्षांपासून ती कोणत्याच चित्रपटात झळकलेली नाहीये. त्यामुळे करिश्मा आता पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली आहे. गेल्याच वर्षी अल्ट बालाजीच्या 'मेंटलहुड' या वेबसिरिजद्वारे ती अभिनयक्षेत्रात पुनरागमन केले होते.  एका आईच्या आयुष्यात किती चढ-उतार येतात हे रसिकांना या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळाले होते.

करिश्माने वेबसिरिद्वारे अभिनय क्षेत्रात कमबॅक केल्यानंतर आता ती लवकरच सिनेमात झळकेल अशी आशा करायला हरकत नाही. करिश्मा आणि करिना या दोघी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. करिश्माला एका मुलाखतीत तुझ्या कोणत्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये करिनाने काम करावे असे तुला वाटते असे विचारण्यात आले होते. त्यावर करिश्माने क्षणाचाही विलंब न लावता बिवी नं १ या सिनेमाचे नाव घेतले.

टॅग्स :करिश्मा कपूर