Join us

जीजू सैफकडून मिळालेलं हे गिफ्ट करिश्मानं आजही ठेवलंय सांभाळून, नक्की आहे तरी काय हे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 06:00 IST

करिश्माने सैफ अली खान व करीनाच्या लग्नादरम्यान मिळालेल्या भेटवस्तूंचाही उल्लेख केला.

करीना कपूर सध्या आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम'चं लंडनमध्ये शूटिंग करते आहे. तिची मोठी बहिण करिश्मा कपूर हिने गेस्ट जज म्हणून रिएलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' सीझन ७मध्ये सहभाग घेतला आहे. या शोमध्ये करिश्मा चित्रीकरणादरम्यान रॅपर रफ्तार व कोरियोग्राफर बोस्कोसोबत मजामस्ती करताना दिसणार आहेत. या शोमध्ये करिश्माने सैफ अली खान व करीनाच्या लग्नादरम्यान मिळालेल्या भेटवस्तूंचाही उल्लेख केला. 

'डान्स इंडिया डान्स' शोदरम्यान करिश्माने सैफ अली खान व करीना कपूरच्या लग्नाबद्दल सांगितलं. २०१२ साली सैफ व करीना यांच्या लग्नाबद्दल बोलताना करिश्मा कपूरने सैफकडून मिळालेल्या गिफ्टबद्दल सांगितलं.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार करिश्माने सांगितलं की, नवाब साहेबने नवाबी अंदाजात मला खुप सुंदर भेट दिली. त्यांनी मला इयररिंग्स दिले होते. जे आजही मी सांभाळून ठेवले आहेत. सैफच्या पर्सनॅलिटीबद्दल करिश्मा म्हणाली की, ते एक चांगला व सुपर कूल व्यक्ती आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर करिश्माने डिजिटल माध्यमात पदार्पण केलं आहे. या शोचं नाव मेंटलहुड आहे आणि हा शो डिजिटल माध्यमात प्रदर्शित होणारेय. तर सैफ अली खानची सीरिज सेक्रेड गेम्स २ ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्सची या सीरिजचा दुसरा सीझन १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याशिवाय सैफ नवदीप सिंगच्या लाल कप्तान चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सैफ, सुशांत सिंग राजपूत व संजना संघी यांच्या दिल बेचारा सिनेमात कॅमियो करताना दिसणार आहे. हा सिनेमा हॉलिवूड चित्रपट दि फॉल्ट इन आर स्टार्सचा हिंदी रिमेक आहे.

करीना कपूर खान, इरफान खान सोबत अंग्रेजी मीडियम चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय करण जोहरचा मल्टीस्टारर चित्रपट तख्तमध्ये देखील पहायला मिळणार आहे. 

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरकरिश्मा कपूर