Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात करीना आणि सैफ का राहिले गैरहजर ? 'बेबो' पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 16:28 IST

नुकतंच करीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही सोहळ्यात उद्योग, मनोरंजन, खेळ, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. या लग्नात मात्र बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर आणि सैफ आली खान हे पॉवरफुल कपल गैरहजेरी राहिलं. लग्नाला उपस्थित राहू न शकल्याने नुकतंच करीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

करीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने  स्वत:तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे.  हा फोटो राधिका आणि अनंत अंबानी यांचा आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये करीनाने लिहलं, "तुम्हा दोघांनाही आयुष्यभर आनंद मिळावा. सगळ्यांसोबतचं सेलिब्रेशन करनं मीस केलं. आमच्याकडून खूप प्रेम. सैफ आणि करीना". 

आता अनंत आणि राधिकाचा 12 जुलै रोजी शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सैफ आणि करीना दिसले नाहीत. संगीत आणि हळदी समारंभातही ते दिसले नव्हते. कारण, सैफ अली खान आणि करीना कुटुंबासोबत परदेशात सुट्टी घालवत आहेत. त्यामुळे हे दोघेही शुक्रवार-शनिवारी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. सध्या करीना सैफसोबत ग्रीसमध्ये आहे. सैफ आणि करिना मुलांसोबत इथेच वेळ घालवत आहेत. दोघंही भारतात कधी परतणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर करीना ही लवकरच 'सिंघम अगेन'मध्ये झळकणार आहे. याशिवाय करीनाचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' नावाचा चित्रपट 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एक जबरदस्त थ्रिलर सिनेमा आहे. तर याआधी करीना 'लाल सिंह चड्ढा'नंतर 'जाने जान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर सैफ अली खान 'देवारा'च्या रिलीजच्या तयारीत आहे. या चित्रपटात तो ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडसैफ अली खान