Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणधीर कपूर यांच्या ‘डिनर पार्टी’चे फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, निर्दयी लोक ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 11:18 IST

5 दिवसांआधी घरातील सदस्याचे निधन झाले असताना कपूर कुटुंबात बर्थ डे सेलिब्रेशन होत आहे म्हटल्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्दे 9 फेब्रुवारीला अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. ते 58 वर्षांचे होते.

आज 15फेब्रुवारीला बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते व करिना-करिश्माचे पापा रणधीर कपूर यांचा 74 वा वाढदिवस. काल 12 च्या ठोक्याला रणधीर कपूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. चेंबूर येथील कपूर फॅमिलीच्या घरात रणधीर यांच्या वाढदिवसानिमित्त खास डिनर पार्टी आयोजित केली गेली. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मात्र हे फोटो पाहताच, लोकांनी या सर्वांना  अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले. कारण 5 दिवसांआधीच रणधीर कपूर यांचे लहान बंधू राजीव कपूर यांचे निधन झाले होते. 5 दिवसांआधी घरातील सदस्याचे निधन झाले असताना कपूर कुटुंबात बर्थ डे सेलिब्रेशन होत आहे म्हटल्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली.

 या पार्टीला रणबीर कपूर, त्याची गर्लफे्रन्ड आलिया भट, करिना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, संजय कपूर, आदर जैन, तारा सुतारिया, बबीता कपूर, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर सगळे एकत्र दिसले. 

विशेषत: करिना कपूर आणि रणबीर कपूर या दोघांना लोकांनी लक्ष्य केले. काकाच्या निधनाला एक आठवडाही झाला नसतात हे लोक पार्टी कसे करू शकतात? असा सवाल नेटकºयांनी केला. बॉलिवूडमध्ये कोणाजवळही भाव-भावना नाहीत, हेच यावरून दिसतेय, असे एका युजरने लिहिले. अनेकांनी राजीव कपूर यांच्या निधनानंतर पार्टी करणा-या कपूर कुटुंबाना ‘हार्टलेस पिपल्स’ म्हणून ट्रोल केले.

13 फेब्रुवारीला राजीव कपूर यांचा ‘चौथा’ आयोजित केला गेला होता. यावेळी कपूर कुटुंबासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज हजर होते. 9 फेब्रुवारीला  अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे  हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. ते 58 वर्षांचे होते. रणधीर कपूर, ऋषी कपूर यांचे राजीव सर्वात धाकटे बंधू होते. 

टॅग्स :रणधीर कपूरराजीव कपूरकरिना कपूर