Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूरने शेअर केला बेबी बंपचा पहिला ओपन Pic, एका ब्रॅन्डसाठी करतेय शूट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 16:27 IST

आता तिने एका स्पोर्ट वेअर बनवणाऱ्या कंपनीसाठी जाहीरात शूट केली. करिनाने या शूटदरम्यानचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केलाय.

करिना कपूर खान गेल्या काही महिन्यांपासून तिच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीमुळे चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने प्रेग्नेन्सीदरम्यानही काम सुरूच ठेवलं आहे. गेल्या महिन्यातच तिने आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' शूटींग पूर्ण केली होती. आता तिने एका स्पोर्ट वेअर बनवणाऱ्या कंपनीसाठी जाहीरात शूट केली. करिनाने या शूटदरम्यानचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केलाय.

या सेल्फीमध्ये करिना कपूर स्पोर्ट्स वेअरमध्ये दिसत आहे आणि पहिल्यांदाच तिचं बेबी बंपचा ओपन पिक शेअर केलाय. तिचा हा फोटो तिच्या फॅन्सना फारच पसंत पडत आहे. 

करिना कपूरच्या खास सेल्फीवर रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धीमा साहनी, मसाबा गुप्ता, अमृता अरोरा, मनीष मल्होत्रा, कियारा अडवाणी, सानिया मिर्झा, मृणाल ठाकूर सारख्या सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.

यादरम्यान वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर करिना अखेरची अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांजसोबत 'गुड न्यूज' सिनेमात दिसली होती. आता ती आमीर खानची मुख्य भूमिका असलेल्याा 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा दिसणार आहे. यासोबतच करिनाने करण जोहरच्या मल्टीस्टारर 'तख्त'मध्येही ती दिसणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरसोशल मीडियाबॉलिवूड