बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर यांनी 'मेट गाला २०२६' मध्ये दिमाखदार पदार्पण केले आहे. या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात सहभागी होणारे ते पहिले भारतीय चित्रपट निर्माते ठरले आहेत. ६ मे २०२६ रोजी न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात करण जोहर यांनी मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेले खास कपडे परिधान केले होते. हा पोशाख प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या अजरामर कलाकृतींनी प्रेरित होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रेड कार्पेटवर बीबीसीशी संवाद साधताना करण जोहर यांनी आपला जवळचा मित्र आणि सुपरस्टार शाहरुख खानचा खास उल्लेख केला. शाहरुख खानने गेल्या वर्षी, म्हणजेच २०२५ मध्ये मेट गालात पदार्पण केले होते. शाहरुखच्या पावलावर पाऊल ठेवून करणनेही या फॅशन सोहळ्यात शानदार पदार्पण केलं.करणने सांगितले की, शाहरुख त्याच्या कारकीर्दीत कायमच त्याच्यासोबत असून आजवरच्या यशात शाहरुखचं खूप योगदान आहे. करणच्या कारकिर्दीतील पहिले पाच चित्रपट शाहरुखसोबतच होते आणि त्याचमुळे तो आज या स्थानावर आहे. गेल्या वर्षी तो आला आणि यंदा मी, हे पाहून आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते, अशी भावना करणने व्यक्त केली.
यशस्वी दिग्दर्शक-अभिनेता जोडीकरण जोहर आणि शाहरुख खान ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता-दिग्दर्शक जोडींपैकी एक मानली जाते. 'कुछ कुछ होता है' या करण जोहरच्या पहिल्या चित्रपटापासून सुरू झालेला हा प्रवास 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'माय नेम इज खान' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपर्यंत पोहोचला. या चित्रपटांनी केवळ बॉलिवूडला नवी दिशा दिली नाही, तर ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० च्या दशकात मुख्य प्रवाहातील चित्रपटाला एक नवा आकार दिला.
या खास प्रसंगी करणने भारताची कला आणि संस्कृती जागतिक स्तरावर सादर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, मनीष मल्होत्रासोबत असलेल्या ३० वर्षांच्या जुन्या मैत्रीची आठवण काढत या खास क्षणासाठी त्यांचे आभार मानले. करण जोहर यांच्या मेट गालातील उपस्थितीचे बॉलिवूडमधील कलाकारांनी कौतुक केले असून, सोशल मीडियावरही करणच्या लूक आणि आत्मविश्वासाला मोठी पसंती मिळाली आहे.
Web Summary : Karan Johar debuted at Met Gala 2026, acknowledging Shah Rukh Khan's influence on his career. He wore a Manish Malhotra design inspired by Raja Ravi Varma. Karan attributed his success to their collaborations, celebrating Indian art globally.
Web Summary : करण जौहर ने मेट गाला 2026 में डेब्यू किया, शाहरुख खान के करियर पर प्रभाव को स्वीकार किया। उन्होंने राजा रवि वर्मा से प्रेरित मनीष मल्होत्रा का डिजाइन पहना था। करण ने अपनी सफलता का श्रेय सहयोग को दिया।