Join us

"तर मला देश सोडून कायमचं जावं लागेल", करण जोहर असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:46 IST

नुकतंच एका मुलाखतीमध्ये करण जोहरनं मोठा खुलासा केलाय.

Karan Johar on Bollywood Whatsapp Group: करण जोहर (Karan Johar) बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. करण त्याच्या चित्रपटांसोबतच इंडस्ट्रीबद्दल गॉसिप करणं आणि पर्सनल गोष्टी खोदून विचारण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'कॉफी विथ करण'सारख्या टॉक शोमध्ये तो बॉलिवूडमधीलसेलिब्रिटींकडून खासगी आणि वादग्रस्त गोष्टी बाहेर काढण्यात किती कुशल आहे, हे अनेकदा दिसून आलं आहे. अनेक कलाकार त्याच्या या गॉसिपप्रेमामुळे अडचणीत आले आहेत. काही तर आता त्याच्या शोवर जाणंही टाळतात. अनेक मुलाखतींमध्ये, चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनी करणच्या गॉसिपिंगच्या सवयीबद्दल सांगितले.अशातच आता खुद्द करणनं एका मुलाखतीमध्ये याविषयावर भाष्य केलंय.

एका मुलाखतीत नुकतेच कारण जोहर बरखा दत्त यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारण्यात आलं होतं की, बॉलिवूडच्या व्हॉट्सॲप ग्रुप चॅटस, या खाजगी गप्पांमधून होणाऱ्या गॉसिपला पुस्तकात किंवा चित्रपटात रूपांतरित करण्याचा विचार आहे का? या प्रश्नावर करण जोहर विनोदी शैलीत उत्तर दिलं. तो म्हणाला, "जर कुणी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील चॅट वाचल्या तर आम्हाला हे शहर कायमचं सोडून लंडनला जावं लागेल".

पुढे करणने सांगितलं की, "मी आणि माझे मित्र आमच्या आजूबाजूला काय चालले आहे याचे अतिशय स्पष्ट आणि प्रामाणिकपणे विश्लेषण करतो. यात आम्ही कधी फॅशनबद्दल टीका करतो, तर कधी चित्रपट समीक्षक बनतो. थोडक्यात आम्ही त्या ग्रुपमधील प्रत्येक गोष्टीचे समीक्षक आहोत. आमच्यापैकी कोणीही कधीही ती मते बाहेर मांडू शकत नाही. बाहेरच्या कोणी त्या गप्पा वाचल्या तर आम्हाला इथे राहणं अवघड होईल. मुंबई सोडून जावं लागेल", असं तो म्हणाला. 

टॅग्स :करण जोहरबॉलिवूडसेलिब्रिटीव्हॉट्सअ‍ॅपलंडन