Join us

झक्कास!! रिया कपूरला बॉयफ्रेन्डने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 17:15 IST

अनिल कपूर यांची लहान लेक रिया कपूर हिचा आज वाढदिवस. फॅमिलीतील सर्वांनी रियाला शुभेच्छा देत पोस्ट शेअर केल्यात. पण यादरम्यान एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देसोनमच्या लग्नात रिया व करणचे नाते पहिल्यांदा जगाच्या नजरेत आले. यादरम्यान करणने रियासोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये ‘माय गर्ल’ असे त्याने लिहिले होते.

अनिल कपूर यांची लहान लेक रिया कपूर हिचा आज वाढदिवस. काल 12 च्या ठोक्याला रियाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. फॅमिलीतील सर्वांनी रियाला शुभेच्छा देत पोस्ट शेअर केल्यात. पण यादरम्यान रियासाठीच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. होय, ही पोस्ट कोणाची तर रियाचा बॉयफ्रेन्ड करण बुलानी याची.करण बुलानीने इन्स्टाग्रामवर रियाचे तीन फोटो शेअर करत, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. ‘तु जितका आनंद माझ्या आयुष्यात घेऊन आली आहेस, तितकाच आनंद एखाद्या दिवशी मी तुझ्या आयुष्यात आणू शकेल, अशी आशा मी करतो. तुझा वाढदिवस प्रेम व आनंदाने भरलेला असो, गतवर्षापेक्षाही हे वर्ष तुझ्यासाठी खास ठरो... हॅपी बर्थ डे,’ असे करणने लिहिले.

2019 मध्ये अनिल कपूरने रियाच्या कथित बॉयफ्रेन्डची भेट घेतली होती. मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर त्यांना पाहिले गेले होते. या फॅमिली डिनरचे फोटोही व्हायरल झाले होते. अनेकदा करण अनिल कपूरच्या फॅमिली फंक्शनमध्ये दिसला आहे. करण हा क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आणि नेटफ्लिक्स सीरिजचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहे .  आयशा आणि वेक अप सिड  या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले आहे.अलीकडे त्याने द आॅडिशन  ही शॉर्ट फिल्म त्याने दिग्दर्शित केली होती. अनेक टीव्ही शोच्या प्रॉडक्शन टीममध्ये त्याने काम केले आहे. तर रिया एक फॅशन डिझाईनर. निमार्ती अशीही तिची ओळख आहे.

सोनमच्या लग्नात रिया व करणचे नाते पहिल्यांदा जगाच्या नजरेत आले. यादरम्यान करणने रियासोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये ‘माय गर्ल’ असे त्याने लिहिले होते. त्यापूर्वी फॅशन डिझाईनर संदीप खोसला व अबु जानीच्या भाचीच्या लग्नात दोघांनाही एकत्र पाहिले गेले होते.केवळ इतकेच नाही तर अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नातही करण सहभागी झाला होता. याशिवाय रियाची आई सुनीता कपूर हिच्या लंडनमधील बर्थ डे सेलिब्रेशनवेळीही तो रियासोबत होता

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूर