Join us

ईदनिमित्त कपिल शर्माची चाहत्यांना खास भेट, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:23 IST

कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाला आहे.

Kapil Sharma New Movie: कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. कपिल शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्याची सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. आता कपिल शर्मा याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाला आहे.  ईदच्या निमित्ताने त्याने त्याच्या नवीन चित्रपटची घोषणा केली आहे. 

कपिल शर्मा 'किस किस को प्यार करूं २' ( Kis Kisko Pyaar Karoon 2) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज ईदच्या निमित्तानं त्यानं चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये तो पांढऱ्या रंगाची शेरवानीत नवरदेवाच्या वेशात दिसतोय. तर त्याच्या बाजूला एक मुलगी उभी आहे. तिचा चेहरा झाकलेला आहे. . या चित्रपटात कपिलसोबत मनजोत सिंग मुख्य भूमिकेत आहे. कपिलच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर पाहून चाहते खुश झालेत. चाहत्यांसह इंडस्ट्रीतील कलाकारांनीही त्याचं अभिनंदन केलं आहे

कपिल शर्माने आतापर्यंत ९ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कपिल शर्माचा २०१० मध्ये 'भावनाओ को समझो' हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंत २०१५ मध्ये त्याचा 'किस किस को प्यार करूं' हा चित्रपट आला होता.  यानंतर तो 'ज्विगाटो'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर गेल्यावर्षी कपिल अभिनेत्री तबूसोबत  'द क्रू' या चित्रपटात दिसला होता. आता कपिल 'किस किस को प्यार करूं'चा दुसरा भाग घेऊन येत आहे.  कॉमेडीने भरपूर असलेल्या या चित्रपटात कपिलला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. 

टॅग्स :कपिल शर्मा बॉलिवूडसेलिब्रिटी