Join us

शॉकिंग! वजन कमी करण्यासाठी केली होती सर्जरी, 21 वर्षीय अभिनेत्रीने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:09 IST

दु:खद! अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनेक नट्या प्लास्टिक सर्जरी करतात. पण अशाच सर्जरीत एका अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला.

Kannada actress Chethana Raj passes away : अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनेक नट्या प्लास्टिक सर्जरी करतात. पण अशाच सर्जरीत एका कन्नड अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. चेतना राज ( Chethana Raj) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. कन्नड टेलिव्हिजनची ती लोकप्रिय अभिनेत्री होती. 21 वर्षीय चेतनाने बेंगळुरूच्या एका खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

रिपोर्टनुसार, चेतना राजने अलीकडे वजन कमी करण्यासाठी फॅट फ्री सर्जरी केली होती. बंगळुरूमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अभिनेत्रीने फॅट फ्री सर्जरी करुन घेतली होती. सर्जरीनंतर काही तासांतच तिला अस्वस्थ वाटू लागलं.  तिला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. तिच्या फुफ्फुसांत पाणी भरलं. याचदरम्यान काल 16 मे रोजी तिचं निधन झालं.

चेतनाच्या निधनाचं वृत्त ऐकून तिच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. निष्काळजीपणामुळे आपल्या मुलीचा जीव गेल्याचा दावा ते करत आहेत. सध्या अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आईवडिलांना नव्हती सर्जरीची माहिती रिपोर्टनुसार, चेतनाने सर्जरीबद्दल आपल्या आईवडिलांना काहीही माहिती दिली नव्हती.  ती एकटी आपल्या मित्रांसोबत हॉस्पिटलमध्ये गेल्याचं सांगण्यात येत आहे. चेतना कन्नड टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक टीव्ही मालिकामध्ये काम केलं होते. गीता आणि दोरेसानी या मालिकेतील तिची भूमिका गाजली होती.

 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी