Join us

कंगना रानौतच्या मदतीला सरसावली बहिण, क्रिशला सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:14 IST

अभिनेत्री कंगना रणौतचा मणिकर्णिका चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कंगनाचा अभिनय आणि दिग्दर्शनाचे सगळीकडून खूप कौतूक होत आहे.

ठळक मुद्देकंगना रणौतचा 'मणिकर्णिका' चित्रपट नुकताच झाला प्रदर्शित

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा मणिकर्णिका चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कंगनाचा अभिनय आणि दिग्दर्शनाचे सगळीकडून खूप कौतूक होत आहे. मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच यशाच्या श्रेयावरून वाद सुरू झाला आहे. कंगानाला श्रेय लाटण्याची सवय आहे. तिनं मणिकर्णिकाचे ७० % दिग्दर्शन केले हा दावा खोटा आहे असे अनेक आरोप पटकथा लेखक अपूर्व आणि दिग्दर्शक क्रिश याने केले आहेत. या वादावर कंगनाने सध्या चुप्पी साधली आहे. मात्र कंगनाची पाठराखण करण्यासाठी नेहमीप्रमाणे तिची बहिण रंगोली पुढे सरसावली आहे.

रंगोलीने दिग्दर्शक क्रिशला तुम्ही संपूर्ण मणिकर्णिका दिग्दर्शित केला असे आम्ही यापुढे मानून चालतो. आता कृपा करून शांत बसा. कंगना या चित्रपटाचा खरा चेहरा आहे. तिला यशाचा आनंद घेऊ द्या. तुम्ही तिला कृपा करून एकटे सोडा असे म्हणत खडेबोल सुनावले आहेत.

‘मणिकर्णिका’च्या ७० % भागाचं आपण दिग्दर्शन केल्याचा दावा कंगनाने केला आहे. मात्र या चित्रपटाचा सहदिग्दर्शक क्रिश याने कंगनाचा दावा खोडून काढला आहे. तिनं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या अवाजवी हस्तक्षेपाला कंटाळूनच मी चित्रपट सोडला. सुदैवाने कंगानने मणिकर्णिका चित्रपटाची वाट लावली नाही हे नशीब असे क्रिश म्हणाला होता. यावर कंगनाची बहिण रंगोलीने क्रिशला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौत