Join us
Daily Top 2Weekly Top 5

#KanganaAwardWapasKar होतोय ट्रेंड; कंगना म्हणतेय,'...तर मी माझे सर्व अवॉर्ड्स परत करेन, एका क्षत्रियचं वचन आहे'

By तेजल गावडे | Updated: October 7, 2020 20:53 IST

सोशल मीडियावर #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. आता कंगनाने ट्विट करत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील मर्डर थेअरी फेटाळून लावल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. आज दिवसभर  #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. आता कंगना राणौतने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. 

कंगना राणौतने  #KanganaAwardWapasKar सोबत ट्विट करत म्हटले की, ही आहे माझी मुलाखत जर स्मृती भ्रंश झाली असेल तर पुन्हा पहा, जर मी एकही खोटा किंवा चुकीचा आरोप लावला असेल तर मी माझे सर्व अवॉर्ड्स परत करेन, हे एका क्षत्रियचं वचन आहे. मी राम भक्त आहे, प्राण जाईल पण वचन तोडणार नाही. जय श्री राम.

काय आहे प्रकरण?कंगना राणौतने एका मुलाखतीत सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला हत्या सांगितले होते. ती म्हणाली होती की, जर तिचा एकही दावा खोटा निघाला तर ती तिचा पद्मश्री पुरस्कार परत करेन. 

सुशांतची हत्या की आत्महत्या?

एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे अध्यक्ष गुप्ता यांनी शनिवारी सांगितले होते की, मेडिकल बोर्डाने सुशांत प्रकरणात हत्याची शक्यता फेटाळून लावली आहे आणि ती आत्महत्या असल्याचे सांगितले. बऱ्याच मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एजेंसीनेदेखील हत्येचा दावा फेटाळून लावला आहे. 

स्वरा भास्करने साधला निशाणाया वृत्तानंतर ट्विटरवर #KanganaAwardWapasKar हॅशटॅग ट्रेंड करताना दिसतो आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनावर निशाणा साधत म्हटले की, 'आता सीबीआय आणि एम्स दोघेही या निष्कर्षावर पोहचली आहे की सुशांत सिंग राजपूतचे दुःखद निधन सुसाइड होते. काही लोक सरकारकडून दिलेला पुरस्कार परत करण्याबद्दल बोलत होते ना.'

 

टॅग्स :कंगना राणौतसुशांत सिंग रजपूतट्विटर