कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आणि चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच हा चित्रपट वादात सापडला आहे. होय, अभिनेता एंडी वॉन इच याने चित्रपटाच्या निर्मात्यावर मानधनाची पूर्ण रक्कम न दिल्याचा आरोप केला आहे.झी स्टुडिओने कमल जैन व निशांत जैन यांच्यासोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वॉन इचने या चित्रपटात इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. काल मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला. दुसरीकडे वॉनने सोशल मीडियावर निर्मात्यांबद्दलची नाराजी बोलून दाखवली.
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ पुन्हा नव्या वादात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 10:16 IST
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आणि चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच हा चित्रपट वादात सापडला आहे.
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ पुन्हा नव्या वादात!
ठळक मुद्देहोय, अभिनेता एंडी वॉन इच याने चित्रपटाच्या निर्मात्यावर मानधनाची पूर्ण रक्कम न दिल्याचा आरोप केला आहे.