Join us

जयललिता यांच्या बायोपिकला ग्रीन सिग्नल, 'या' महिन्यात सुरु करणार कंगना शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 15:22 IST

कंगना राणौत जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात दिसणार आहे. नुकतेच कंगनाने यासंदर्भात सोशल मीडियावर घोषणा केली आहे

ठळक मुद्देकंगाना राणौत लवकरच 'थलाईवी' सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहेहा सिनेमा तमिळ आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येणार आहे

कंगना राणौत जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात दिसणार आहे. नुकतेच कंगनाने यासंदर्भात सोशल मीडियावर घोषणा केली आहे. आता या सिनेमासंदर्भात आणखी एक नवी माहितीसमोर येतेय.   

कंगाना राणौत लवकरच 'थलाईवी' सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे. आता शूटिंगच्या तारखेबाबत खुलासा करण्यात आला आहे. फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार कंगना जुलै महिन्यात सिनेमाच्या शूटिंग सुरुवात करणार आहे. जयललिता यांचा भाचा दीपक जयकुमार यांनी सिनेमाच्या मेकर्सना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील दिले आहे. हा सिनेमा तमिळ आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येणार आहे. या भूमिका साकारण्यासाठी कंगना तमिळ भाषेचे धडे गिरवणार असल्याचे तिने सांगितले.  जयललिता यांची भूमिका समजण्यासाठी कंगना तमिळ शिकणार आहे. कंगना या सिनेमाला घेऊन खूपच उत्साही असल्याचे ती म्हणाली.

एएल विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून कवी विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. कंगना या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी तब्बल कंगनाने २४ कोटी रूपयांची भरभक्कम फी मागितली आहे.    

जयललिता या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. अभिनयात मिळालेल्या यशानंतर त्या राजकारणाकडे वळल्या. त्यांनी तेलगू, कन्नड तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तामिळनाडूच्या त्या माजी मुख्यमंत्री होत्या. त्यांचे निधन 2016 मध्ये झाले.  

टॅग्स :कंगना राणौत