Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमचे प्रेम पैशात मोजू नका...! आता शशी थरूर यांच्यावर बिथरली कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 14:22 IST

होय, शशी थरूर यांनी कमल हासन यांच्या कल्पनेचे स्वागत केले आणि ते पाहून कंगना बिथरली.

ठळक मुद्देकंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतेच तिने ‘थलायवी’ या सिनेमाचे शूटींग पूर्ण केले. आता ती ‘धाकड’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता कोणावर बिथरली तर काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर. होय, शशी थरूर यांनी कमल हासन यांच्या वक्तव्याचे  कौतुक केले आणि ते पाहून कंगना बिथरली.आता ही काय भानगड आहे ते जाणून घेऊ या. तर घरकामाला पगारी नोकरीचा दर्जा दिला जावा. शिवाय घर सांभाळणा-या गृहिणींना मासिक भत्ता देण्यात यावा, असे मत कमल हासन यांनी व्यक्त केले. कमल हासन यांची ही आयडिया अर्थात कल्पना शशी थरूर यांना चांगलीच भावली. त्यांनी लगेच यावर ट्वीट केले.

‘घरकामाला पगारी नोकरीचा दर्जा देण्यात यावा आणि राज्य सरकारांनी घरी काम करणा-या महिलांना मासिक भत्ता द्यावा, या कमल हासन यांच्या कल्पनेचे मी स्वागत करतो. या माध्यमातून घर सांभाळणा-या महिलांना समाजात नवी ओळख मिळेल आणि त्या अधिक शक्तिशाली व स्वायत्त होतील,’ असे ट्वीट शशी थरूर यांनी केले. शशी थरूर यांचे हे विचार कदाचित कंगनाच्या पचनी पडले नाहीत. तिने लगेच यावर प्रतिक्रिया देत थरूर यांना तिच्या शब्दांत सुनावले. 

काय म्हणाली कंगना,

‘आमच्या प्रेमाला आणि लैंगिकतेला पैशात मोजू नका. आपल्या प्रिय व्यक्तिंची काळजी घेण्यासाठी आम्हाला पगाराची गरज नाही. आमच्या छोट्याशा जगात, आपल्या घराची राणी बनण्यासाठी आम्हाला पगार नकोच. प्रत्येक गोष्टीकडे व्यापार म्हणून बघणे बंद करा. फक्त महिलांप्रति समर्पण वृत्ती तेवढी ठेवा. कारण तिला प्रेम व आदराची गरज आहे, पगाराची नाही,’ अशा शब्दांत कंगनाने शशी थरूर यांना उत्तर दिले.कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतेच तिने ‘थलायवी’ या सिनेमाचे शूटींग पूर्ण केले. आता ती ‘धाकड’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा हातावेगळा केल्यानंतर लगेच ती ‘तेजस’च्या शूटींगमध्ये बिझी होणार आहे.

दिलजीतला एन्जॉय करताना पाहून कंगना भडकली, म्हणाली - वाह भावा वाह, हा आहे लोकल क्रांतिकारी...

टॅग्स :कंगना राणौतशशी थरूर