Join us

वामिकाला डेटवर नेऊ का? विचारणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांना कंगनाने झापलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 15:45 IST

Kangana Ranaut, Vamika Date: वामिका ही विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी आहे.

IPL 2023 मधील सर्वात चर्चेत असणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपरकिंग्स सामना पार पडला. या सामन्यात धोनीच्या चेन्नई संघाने विराटच्या बंगलोर संघावर विजय मिळवला. या सामन्यात एक वेगळीच घटना घडली. मॅच पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक अनेकदा त्यांच्या हातात विविध पोस्टर्स घेऊन येतात. त्यावर ते आवडत्या क्रिकेटरसाठी खास संदेश लिहितात. अशातच एका लहान मुलाच्या हाती एक पोस्टर दिसलं आणि त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. त्या लहान मुलाच्या हातातील पोस्टरवर क्रिकेटर विराट कोहलीच्या चिमुरड्या लेकीसाठी एक मजकूर लिहिला होता. त्यावरूनच काही सेलिब्रीटी आणि नेटकरी त्या प्रकारावर भडकल्याचे दिसून आले.

नेमका काय घडला प्रकार?

या सामन्यामध्ये एका लहान मुलाच्या हातात एक पोस्टर होते. त्या पोस्टरवर लिहिण्यात आले होते की-  ‘हाय विराट अंकल, मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?’, त्या पोस्टरवरचा हा मजकूर मजेशीर वाटला असला तरी ते पाहून सेलिब्रिटी आणि नेटकरी चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी त्या मुलाच्या आई-वडिलांवर धारेवर धरले आहे. इतक्या लहान मुलाला असं काही शिकवणं हे कोणत्याही प्रकारे योग्य नाही, प्रकाशझोतात येण्यासाठी अशा पातळीवर घसरू नका, अशा आशयाची टीका नेटकऱ्यांनी केलेली दिसून आली.

कंगना रनौतनेही त्या मुलाच्या आई-वडिलांवर टीका केली. ‘निष्पाप मुलांना असा मूर्खपणा शिकवू नका. यामुळे तुम्ही मॉडर्न आणि कूल अजिताबत वाटत नाहीत. त्यापेक्षा तुम्ही विकृत आणि मूर्ख असल्याचं दिसतं,’ असं तिने लिहिलं. नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत लिहिलं, ‘यामुळे दोन मिनिटांची प्रसिद्धी मिळत असली तरी हे अत्यंत अयोग्य आहे.’ काहींनी तर त्या मुलाच्या आई-वडिलांच्या संगोपनावरही प्रश्न उपस्थित केले. ज्या लहान मुलाच्या हातात ते पोस्टर होते, त्याला त्याचा अर्थही माहीती नसेल, असे अनेकांनी म्हंटले.

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे त्यांची मुलगी वामिका यांच्याबाबतीत खूपच संवेदनशील आहेत. विराट-अनुष्काने अद्याप वामिकाचा चेहरा प्रसारमाध्यमांना दाखवलेला नाही. तिचे फोटो किंवा व्हिडीओ न काढण्याची विनंती त्यांनी पापाराझी, फोटोग्राफर्स आणि माध्यमांना केली आहे. मात्र तरीही विराटच्या एका सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये वामिकाचा चेहरा दिसला होता. परंतु त्यानंतर अनुष्काच्या विनंतीला मान देऊन अनेकांनी ते फोटो आणि व्हिडीओ डीलिट केले होते.

टॅग्स :आयपीएल २०२३कंगना राणौतविराट कोहलीअनुष्का शर्मा