Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य पंचोलीने कंगनाकडून जबरदस्तीने वसूल केले होते १ कोटी रुपये, कंगनाच्या बहिणीने केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 19:05 IST

आदित्य पंचोलीने अभिनेत्री कंगना कडून जबरदस्ती १ कोटी रुपयांहून अधिक पैसे वसूल केल्याचा कंगनाची बहिण रंगोली हिने आरोप केला आहे.

मुंबई पोलिसांनी नुकतेच अभिनेता आदित्य पंचोलीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कंगना रानौतची बहिण रंगोली हिने ट्विट केले आहे. तिने ट्विट करीत आदित्य पंचोलीवर आरोप केला आहे की आदित्य पंचोलीने अभिनेत्री कंगना कडून जबरदस्ती १ कोटी रुपयांहून अधिक पैसे उकळले होते. 

रंगोलीने सांगितले की, पंचोलीच्या विरोधात २००७ साली शारिरीक शोषण व जबरदस्ती वसुलीसाठी तक्रार दाखल केली होती. त्याने कंगनाकडून १ कोटी रुपये हे सांगून घेतले होते की कंगना ज्यावेळी बेघर होती त्यावेळी तीन महिने तिला खाऊ घातले होते. तीन महिन्याच्या भाड्याची रक्कम १ कोटी रुपये यावर रंगोली हिने चिंता व्यक्त केली होती. 

दुसऱ्या ट्विटमध्ये रंगोलीने म्हटले की, त्यानंतरही त्याला अधिक पैसे हवे होते. जबरदस्ती वसुलीचा शेवटचा मेसेज त्याने मला २०१६ साली केला होता. त्यानंतर याविरोधात तक्रार दाखल केली होती. कंगनाकडे या सगळ्या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही.

तिने तिसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, आदित्य व त्याची पत्नीकडून केल्या जाणाऱ्या केससाठी कंगनाकडे वेळ नाही. ती खूप व्यग्र आहे आणि मी तिच्या या केसकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. जेणेकरून कंगनाच्या कामात व्यत्यय येणार नाही.

 

टॅग्स :कंगना राणौतआदित्य पांचोलीरांगोळी