Join us

कंगना राणौतने शेअर केले 'धाकड'मधील अ‍ॅक्शन सीन, चित्रीकरणासाठी खर्च केले २५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 15:28 IST

अभिनेत्री कंगना राणौत सध्या मध्यप्रदेशात 'धाकड'चे चित्रीकरण करते आहे.

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत सध्या मध्यप्रदेशात 'धाकड'चे चित्रीकरण करते आहे. यामध्ये कंगना एका गुप्तहेर महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. 'धाकड'च्या वेगवेगळ्या रोलमधील कलाकारांचे फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहेत.

'धाकड' सिनेमामधील अॅक्‍शन सीनच्या चित्रीकरणासाठी अमाप पैस खर्च केले गेल्याचे नुकतेच कंगनाने सांगितले आहे. एका सीनची तयारी दिवसभर सुरू होती आणि रात्री त्याचे शूटिंग होणार असल्याचे तिने सांगितले. एखादा दिग्दर्शक एखाद्या सीनसाठी एवढी मेहनत घेत असल्याचे आपण यापूर्वी कधी बघितले नव्हते. या एका सीनसाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च झाले.

'धाकड'मधील एकूण अॅक्‍शन सिक्‍वेन्ससाठी तब्बल २५ कोटी रुपये खर्च झाल्याचे तिने सांगितले. 'धाकड'च्या आगोदर कंगनाने 'थलायवी'चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. धाकड'साठी विश्‍वविख्यात फोटोग्राफी डायरेक्‍टर तेत्सुओ नगाता हे फोटोग्राफी डायरेक्‍शन करत आहेत. नगाता मूळचे जपानी पण फ्रेंच डायरेक्‍टर आहेत. त्यांनी जेवढे ऍवॉर्ड मिळवले आहेत. त्यावरून त्यांच्या आंतरराष्ट्रीय किर्तीला साजेसे बजेट ठेवणे क्रमप्राप्त असल्यानेच 'धाकड'च्या निर्मात्यांनी खर्चाची तयारी ठेवली आहे. 'धाकड'मध्ये कंगनासोबत अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दिव्या दत्ताही एका स्पेशल भूमिकेत दिसणार आहे.

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती थलाइवी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका करताना दिसणार आहे. यासोबतच ती तेजस, धाकड आणि मणिकर्णिका रिटर्न्समध्येही झळकणार आहे.

टॅग्स :कंगना राणौत