Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाच्या 'क्वीन'चा सिक्वेल येतोय? चित्रपटाची कथा आणि नाव दोन्ही वेगळं असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:23 IST

अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut Queen Sequel : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगना हिच्या 'क्वीन' (Queen) या चित्रपटाने १२ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'क्वीन'चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. यावेळी चित्रपटाची कथा आणि शीर्षक दोन्ही पूर्णपणे वेगळे असणार आहेत.

कंगनाचा 'क्वीन' हा चित्रपट मार्च २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता, आता तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल येतो आहे. चाहत्यांना या सिनेमाचे नाव 'क्वीन २' असेल अशी अपेक्षा होती. मात्र, लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार,  चित्रपटाचे नाव हे 'क्वीन फॉरएव्हर' (Queen Forever) असू शकते. 'बॉलिवूड हंगामा'नुसार, 'क्वीन फॉरएव्हर' हा सीक्वेल पहिल्या फिल्मची स्टोरी पुढे नेणार नसून एक स्वतंत्र कथा असणार आहे.

काय असेल चित्रपटाची कथा?

'क्वीन'मध्ये एका निरागस, छोट्या शहरातील मुलीचा पॅरिसपर्यंतचा प्रवास पाहिला होता. मात्र, 'क्वीन फॉरएव्हर'मध्ये कंगना ही एका शहरी आणि अत्यंत आत्मविश्वासू तरुणीच्या भूमिकेत दिसेल. चित्रपटाची मूळ संकल्पना 'स्वतःचा शोध' आणि 'स्वातंत्र्य' हीच असली, तरी यावेळी हा प्रवास परदेशी शहरांऐवजी भारतातील विविध मेट्रो शहरांमध्ये घडणार आहे. 

कंगनाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा विकास बहल करणार आहेत. ते चित्रपटाचे लेखकही आहेत. मात्र, स्टारकास्टमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. केवळ कंगना या दुसऱ्या भागातमध्ये कायम असेल, तर इतर सर्व भूमिकांसाठी नवे चेहरे शोधले जात आहेत. चित्रपटाचे शुटिंग हे मुंबईतील स्टुडिओमध्ये पार पडणार आहे.  त्यानंतर टीम इतर मेट्रो शहरांमध्ये शूटिंग करेल. चित्रपटाचे शूटिंग अंदाजे तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Kangana's 'Queen' sequel in the works, new story and title!

Web Summary : Kangana Ranaut's 'Queen' sequel, possibly titled 'Queen Forever', is in development. The film features a new story, focusing on an urban, confident woman's journey across Indian metro cities. Kangana returns, directed by Vikas Bahl, with a fresh cast and shooting planned across Mumbai and other major cities.
टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड