Join us

कंगणा राणौतला अजिबात आवडत नाही सोनू सूद, काय असावे यामागचे कारण?

By निखिल | Updated: May 4, 2021 18:08 IST

सोनू सूद स्वतःला याबाबत कल्पना नसेल की त्याच्या नावाचा वापर करुन काही फ्रॉड लोकं काळाबाजार करत आहेत. अनेक ठिकाणी सोनू सूदच्या नावाखाली फसवणूक सुरु असल्याचे नेटकरी सांगत आहेत.

ट्विटर अकाउंट सस्पेंड झाल्याने कंगणा पुन्हा चर्चेत आहे. पण तिने यापूर्वी एक ट्वीट लाइक केलं होतं ते सोनूच्या विरोधात होतं. सोनूच्या विरोधात आलेल्या ट्विटवर कंगणाचे लाईक पाहून नेटक-यांचीही चांगलीच सटकली. ज्याने निस्वार्थपणे लोकांची सेवा केली त्यालाच कंगणाने नापसंती दिली. हा विषय नेटकऱ्यांनीही चांगलाच लावून धरला आहे.सोनू सूद वर एका युझरने काही आरोप केले आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला.

त्याचे झाले असे की, ऑक्सिजन कंसंट्रेटर मशिनच्या एका जाहीरातीच्या पोस्टरवर सोनू सूद झळकला होता. पोस्टवर असलेले ऑक्सिजन कंसंट्रेटर मशिनची किंमती लाखांत असल्याचे सांगितले गेले होते. याच गोष्टीचा बाऊ करत एका युजरने त्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यात चिटर फ्रॉड असे म्हटले गेले. यासोबतच त्या युजरने लिहीले होते की, लोकांसोबत चांगले बनण्याचे ढोंग करत आहेस. १० लिटर कंसंट्रेटरची किंमत १ लाख कशी ? असे फ्रॉड केल्यानंतर तुला रात्रीची झोप तरी कशी येते.सोनू सूद वर एका युझरने काही आरोप केले आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला.

या ट्विटवर अनेकांनी सोनू सूद फॉड असल्याचे कमेंट केल्या आहेत. तर काहींनी सोनूची बाजू घेत सांगितले की, सोनू सूद स्वतःला याबाबत कल्पना नसेल की त्याच्या नावाचा वापर करुन काही फ्रॉड लोकं काळाबाजार करत आहेत. अनेक ठिकाणी सोनू सूदच्या नावाखाली फसवणूक सुरु असल्याचे नेटकरी सांगत आहेत.

या ट्विटवर अनेक लोकांनी लाईक केले होते. यात सगळ्यात जास्त हैराण करणारी गोष्ट ही होती की, बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगणाने देखील युजरच्या ट्विटला लाईक केले होते. ज्या युजरने ही सोनूच्या विरोधात हे ट्विट केल होते. त्या युजरला कंगणा आधीपासूनच फॉलो करते. कंगणा नेहमीच या ना त्या कारणामुळे प्रत्येकावर निशाणा साधताना दिसते. यावेळी अप्रत्यक्षपणे तिने सोनूवरच निशाणा साधल्याचे समोर आले. एकंदरितच कंगना सोनूवर आणि त्याच्या प्रसिद्धीवर प्रचंड जळते अशा आशयाच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :कंगना राणौतसोनू सूद