Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाच्या अडचणीत वाढ, लेखक आशीष कौल यांनी दाखल केली अवमान याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 10:33 IST

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि लेखक आशीष कौल यांच्यातील कायदेशीर वादाने आता नवे वळण घेतले आहे.

ठळक मुद्देकंगनाने काही दिवसांपूर्वी ‘मणिकर्णिका रिटर्न्स द लीजेंड ऑफ दिद्दा’ हा सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि लेखक आशीष कौल ( Ashish Kaul) यांच्यातील कायदेशीर वादाने आता नवे वळण घेतले आहे. होय, काही दिवसांपूर्वी आशीष कौल यांनी कंगनावर कॉपी राईटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. आता आशीष यांनी अभिनेत्रीविरोधात मुंबई हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. याआधी बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाविरोधात मानहानी दावा दाखल केला आहे. आता कंगनाला आशीष कौल यांच्या आणखी एका प्रकरणाचा सामना करावा लागणार आहे. आशीष यांच्या वकीलांनी सांगितले की, आम्ही जावेद अख्तर यांना पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर आम्हाला मिळाले आहे. कंगनाने पासपोर्ट अर्जासाठी दिलेली तथ्ये खोटी आहेत आणि हा एक गंभीर गुन्हा आहे, असे आम्हाला पत्राच्या उत्तरातून कळले. आम्ही हायकोर्टात ही बाब मांडू आणि कोर्टात फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास त्याचा निकाल जरूर लागेल, असे वकीलांनी सांगितले.

काय आहे वादकंगनाने काही दिवसांपूर्वी ‘मणिकर्णिका रिटर्न्स द लीजेंड ऑफ दिद्दा’ हा सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली होती. हा सिनेमा ज्यांच्या पुस्तकावर आधारित आहेत, त्याचे लेखक आशीष कौल आहेत. कंगनाच्या घोषणेनंतर आशीष यांनी कंगनाविरोधात कॉपी राईट उल्लंघनाचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली होती. आता हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहोचले आहे.

टॅग्स :कंगना राणौत