बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री कंगना राणौत सध्या ‘पंगा’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सध्या दिल्लीत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. काल कंगना दिल्लीत फेरफेटका मारायला बाहेर पडली. अचानक तिची नजर रस्त्यावर उभ्या चाट सेंटरवर पडली. मग काय, ‘मणिकर्णिका’ला पाणीपुरी खाण्याचा मोह आवरता आला नाही. यानंतर कंगनाने गाडीतचं बैठक मारली आणि पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारला. दिल्लीच्या रस्त्यावर कंगनाला पाणीपुरी खाताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण बिनधास्त कंगना मात्र पाणीपुरी खाण्यात मग्न होती. पाणीपुरी खातानाचा तिच्या चेहºयावरचा आनंद बघण्यासारखा होता. कंगनाच्या टीमने ‘मिशन गोलगप्पा’ या नावाखाली कंगनाचा पाणीपुरी खातानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांना कंगनाच्या ‘क्वीन’ चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात कंगना एम्स्टर्डममध्ये भारताच्या लोकप्रिय स्ट्रिट फूडचा स्टॉल लावते.
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौतने पाणीपुरीवर मारला यथेच्छ ताव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 10:08 IST
काल कंगना दिल्लीत फेरफेटका मारायला बाहेर पडली. अचानक तिची नजर रस्त्यावर उभ्या चाट सेंटरवर पडली. मग काय, ‘मणिकर्णिका’ला पाणीपुरी खाण्याचा मोह आवरता आला नाही.
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौतने पाणीपुरीवर मारला यथेच्छ ताव!
ठळक मुद्देलवकरच कंगना ‘पंगा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात कंगना एका कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.