Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाकडे प्रेक्षकांची पाठ? तीन दिवसात कमावले अवघे इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:34 IST

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत

कंगना राणौतची प्रमुख भूमिका असलेला 'इमर्जन्सी' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमातील कंगनाच्या अभिनयाचं समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केलंय. 'इमर्जन्सी' निमित्ताने कंगनाची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा अनेक वर्षांनी रिलीज झाला. ट्रेलर वगैरेला मिळालेल्या प्रतिसादावरुन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु चित्र काहीतरी वेगळंच आहे. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसून येतेय. 

कंगनाच्या 'इमर्जन्सी'चं कलेक्शन किती?

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचं लेटेस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलंय. यानुसार वीकेंडलाही कंगनाच्या 'इमर्जन्सी'कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसतेय. या सिनेमाने पहिल्याच दिवशी अवघ्या २.५ कोटींचा व्यवसाय केला. नंतर शनिवारी ३.६ कोटी तर रविवारी ४.३५ कोटींचा बिझनेस केला.त्यामुळे तीन दिवसात कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाने अवघ्या १०.४५ कोटी कमावले आहेत. आता मधल्या वारांमध्ये 'इमर्जन्सी' किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.

'इमर्जन्सी' सिनेमाविषयी सांगायचं तर

प्रचंड चर्चा आणि वाद होऊनही 'इमर्जन्सी' सिनेमाकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवलेली दिसून येतेय. 'मणिकर्णिका' सिनेमानंतर कंगनाने दिग्दर्शित केलेला हा दुसरा सिनेमा आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात जी आणीबाणी लावली होती त्या घटनाक्रमांवर हा सिनेमा आधारीत आहे. सिनेमात कंगनाने इंदिरा गांधींची भूमिका साकारली असून अनुपम खेर, सतीश कौशीक, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण हे कलाकारही पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :इंदिरा गांधीकंगना राणौतश्रेयस तळपदेमिलिंद सोमण