Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतने मीडियासमोर केला किळसवाणा प्रकार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 10:46 IST

व्हिडीओ पाहून भल्याभल्यांनाही आश्चर्यात पाडेल असा तो कंगणाचा (Kangna Ranout) व्हिडीओ आहे. व्हिडीओ समोर आल्यापासून पाहणारे नक्कीच विचारात पडतील. तर हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटमधला आहे.

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. यात सर्वाधिक चर्चेत असते ती बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut). मुद्दा कोणताही असो ती बोलणारच.

कंगना कोणत्या मुद्द्यावर  विचार मांडत नाही असे होतच नाही. कंगानाला तसेही चर्चेत येण्यासाठी काही खास कारण हवीच असं नाही. त्याव्यतिरिक्तही ती चर्चेच असते. ती जिथे जाते तिथे मीडियाच्या नजरा आता कंगनावरच असतात. सध्या अशाच एका व्हिडीओमुळे कंगना चर्चेत आहे. यावेळी कोणतेही खोचक विधान केल्यामुळे ती चर्चेत आली नाहीय. तर एका वेगळ्याच कारणामुळे तिची चर्चा होत आहे. 

व्हिडीओ पाहून भल्याभल्यांनाही आश्चर्यात पाडेल असा तो कंगनाचा व्हिडीओ आहे. व्हिडीओ समोर आल्यापासून पाहणारे नक्कीच विचारात पडतील. तर हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटमधला आहे. रेस्टॉरंटमध्ये आवडत्या पदार्थांवर ताव मारताना ती दिसते. याच व्हिडीओमुळे कंगनावर ट्रोलर्सनी चांगलाच निशाणा साधला आहे. 

 

मीडियाला पोज देण्यासाठी वेटरने केकचा ट्रे तिच्यासमोर आणला. या ट्रेमधून ती केकचा एक तुकडा उचलते. तो तोंडाजवळ नेते काही वेळ तसाच पकडून पोज देते. पोज देऊन झाल्यानंतर तोच केक परत ती त्याच ट्रेमध्ये ठेवते. कंगनाचं हाच किळसवाणा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा प्रकारे निष्काळजीपणे वागणं कितपत योग्य? सेलिब्रेटी कंगनाने इतकं तरी भान ठेवणं गरजेचे होतं. जेव्हा कंगनाचे असे कृत्य कॅमेर्‍यात कैद झाले तिलाही तिची चूक उमगली नसेल पण चाहत्यांनी मात्र ती हेरली आणि त्यावर आता जोरदार टीकाही करताना दिसत आहे. 

जेव्हा गेल्याच वर्षी कंगनालाही कोरोनाची लागण झाली होती. घरीच तिने उपचार करत कोरोनावर मातही केली होती. त्यावेळी तिचे चाहतेसुद्धा कंगनाला कोरोनामुक्त होण्यासाठी धीर देताना दिसले होते.कोरोना हा किती घातक असू शकतो याची संपूर्ण कल्पना असूनही कंगनाचं इतकं गलिच्छ वागणं पाहून नक्कीच सगळेच हैरान झाले आहेत.  

टॅग्स :कंगना राणौत