Join us

थलायवी : चित्रपट प्रदर्शनावर मल्टीप्लेक्सेसने घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 11:27 IST

Thalaivi : हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असून कंगना मुख्य भूमिकेत झळकली आहे.

ठळक मुद्देदिवसांपूर्वी चित्रपटगृह मालकांनी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला होता.

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत हिचा आगामी 'थलायवी' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटगृह मालकांनी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. त्यानंतर कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या मालकांवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, आता चित्रपटगृहांचे मालक हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार झाले आहेत. म्हणूनच, कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटगृह मालकांचे आभार मानले आहेत. 

काही दिवसांपूर्वी कंगनाने 'थलायवी' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज व्हावा अशी मागणी चित्रपटगृहाच्या मालकांकडे केली होती. त्यानंतर आता PVRने कंगनाच्या 'थलायवी'ला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे तामिळ आणि तेलुगू भाषेतील थलायवी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. PVR च्या निर्णयानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत जाहीरपणे आभार मानले आहेत.

चिमुकल्या मायराचे रिअल लाइफ आई-वडील कोण माहितीये का? 

"तामिळ आणि तेलुगू भाषेतील थलायवी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा PVR ने घेतला निर्णय. थलायवीच्या टीमसोबतच मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी आतुर झालेल्या प्रत्येक रसिकप्रेक्षकासाठी हा आशेचा किरण आहे", अशी पोस्ट कंगनाने शेअर केली आहे. सोबतच तिने हिंदी थलायवाविषयीदेखील मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात कंगना, जयललिता यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी हा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. 

टॅग्स :थलायवीकंगना राणौतसेलिब्रिटी