Join us

सलमानच्या सल्ल्यावरून भन्साळींना भेटली कंगना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 06:36 IST

मला माहीत नाही. तूच याचा शोध घे.”

कंगना रणौतला सलमान खानने संयज लीला भन्साळी यांना भेटण्याचा फार पूर्वी सल्ला दिला होता. पण, तेव्हा नेमकं काय घडलं हे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये अभिनेता सलमान खान आणि कंगना रणौतच्या मैत्रीची चर्चा रंगत आहे. संजय लीला भन्साळी यांना भेटल्यानंतर काय अनुभव आला? याबाबत बोलताना कंगना म्हणाली, ‘मी माझा पोर्टफोलिओ घेऊन भन्साळी यांना भेटायला गेले होते. माझे बऱ्याच लूकमधील फोटो त्यामध्ये होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला बोलले तू सरडा आहेस का? कारण प्रत्येक लूकनुसार तुझ्यामध्ये बदल जाणवतो. यावर मी त्यांना प्रश्न विचारला की, सर ही चांगली की वाईट गोष्ट आहे? त्यावर त्यांनी मला उत्तर दिलं, मला माहीत नाही. तूच याचा शोध घे.”

करणवर गाणं चोरल्याचा आरोप

दिग्दर्शक करण जोहरचा आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. काही तासांमध्येच हा ट्रेलर लाखो लोकांनी पाहिला. कियारा अडवाणी आणि वरुण धवनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. करणसमोर या चित्रपटामधील गाण्यामुळे नवीन अडचण निर्माण झाली आहे. चित्रपटामधील ‘नाच पंजाबन’ हे गाणं कॉपी केल्याचा आरोप करणवर होत आहे. हे गाणं एका पाकिस्तानी गाण्याचं कॉपी व्हर्जन आहे. पाकिस्तानी गायक अबरार उल हकने याबाबत एक ट्विट करत करणवर आरोप केले आहेत. त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी माझं गाणं नाच पंजाबन कोणत्याच भारतीय चित्रपटाला विकलं नाही. या गाण्याचे राईट्स देखील माझ्याकडे आहेत. जेणेकरून नुकसान भरपाईसाठी मी कोर्टामध्ये धाव घेईन. करण जोहरसारख्या निर्मात्यांनी तरी गाणं कॉपी करू नये. हे माझं सहावं गाणं आहे, जे कॉपी करण्यात आलं आहे.” अबरारचं हे ट्विट पाहता नेटकऱ्यांनी देखील करणला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :सलमान खानकंगना राणौत