अभिनेता व बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमान आर खान (Kamaal R Khan) अर्थात केआरके (KRK) त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतो. केआरकेने ट्वीट केलं आणि वाद झाला नाही, असं अभावानेच घडतं. आता काय तर केआरकेने एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. होय, आता केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूडची ‘पंगा’ गर्ल कंगना राणौतशी ( Kangana Ranaut )पंगा घेत, तिच्या पर्सनल लाईफबद्दल एक मोठा दावा केला आहे. कंगना इम्रान नावाच्या एका व्यक्तिसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा त्याने केला आहे.केआरकेने कंगनाबद्दल एक ट्वीट केलं आणि काही वेळानंतर ते डिलीटही केलं. पण तोपर्यंत त्याच्या या ट्वीटचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले होते. या ट्वीटमध्ये केआरकेने कंगना इम्रान नावाच्या व्यक्तिसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले आहे. ट्वीटसोबत कंगनाचे दोन फोटोही त्याने शेअर केले होते. फोटोतील कंगनासोबत दिसणारी व्यक्ती इम्रान आहे, असा केआरकेचा दावा आहे.
केआरकेचे ट्वीट
त्याचं नाव तर रिझवान...!
केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये ज्या व्यक्तिचा फोटो शेअर केला आहे, त्या व्यक्तिसोबत कंगनाने देखील एक फोटो शेअर केला होता. 28 जुलैला कंगनाने एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टसोबत एक फोटोही होता. केआरकेने याच व्यक्तिचा फोटो त्याच्या ट्वीटसोबत जोडला आहे आणि त्याचे नाव इम्रान असल्याचे म्हटले आहे. कंगनाने मात्र त्याचे नाव रिझवान असल्याचे म्हटले आहे.
केआरकेच्या या दाव्यावर कंगना काय उत्तर देते, याकडे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तूर्तास केआरकेची ही पोस्ट तुफान व्हायरल होतेय.