Join us

न्यासाचा नाईट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल; बोल्ड अंदाजात दिसली काजोल-अजयची लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:13 IST

Nyasa: न्यासाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता अजय देवगण (ajay devgan) आणि काजोल (kajol) यांची लेक न्यासा (nyasa) सातत्याने चर्चेत येत आहे. कधी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे तर कधी तिच्या पार्टीमुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्येच आता न्यासाचा नाईट क्लबमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये न्यासा प्रचंड बोल्ड लूकमध्ये दिसून येत आहे.

न्यासाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ लंडनच्या नाईट क्लबमधील आहे. या क्लबमध्ये ती तिच्या काही मित्रमैत्रिणींसोबत दिसत असून तिने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

न्यासाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे न्यासाने अद्यापही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र, तरीदेखील आताच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या न्यासा तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. मात्र, येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :अजय देवगणकाजोलबॉलिवूडसेलिब्रिटी