Join us

Kajol : जया बच्चन की छोटी बहन..., काजोल पुन्हा झाली ट्रोल, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 17:10 IST

Kajol : कॅमेऱ्यापुढे काजोल बरीच निरागस चेहऱ्यानं वावरत असली तरी रिअल लाईफमध्ये तिचा ‘अ‍ॅटीट्युड’ वेगळाच असतो. यावरून अनेकदा काजोल ट्रोलही होते. पण बिनधास्त काजोलचा त्याची पर्वा नाही.

काजोल (Kajol ) ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. पण यासोबतच ती तिच्या बडबड्या आणि बिनधास्त स्वभावासाठीही ओळखली जाते. कॅमेऱ्यापुढे काजोल बरीच निरागस चेहऱ्यानं वावरत असली तरी रिअल लाईफमध्ये तिचा ‘अ‍ॅटीट्युड’ वेगळाच असतो. यावरून अनेकदा काजोल ट्रोलही होते. पण बिनधास्त काजोलचा त्याची पर्वा नाही.

सध्या काजोल तिच्या ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमधला काजोलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रमोशनल इव्हेंटमध्ये काजोलची एन्ट्री होताच पापाराझींनी तिचे फोटो क्लिक करण्यासाठी एकच गर्दी केली. काही पापाराझींनी तिला अँगल बदलून पोझ देण्याची विनंती केली आणि यानंतर काजोल काहीशी बिथरलेली दिसली. Voomplaने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मैं बता दूं की, चिल्लाना इज स्टुपिड... क्योेंकी मैं देखूंगी जहां पे मुझे चाहिऐ, असं काजोलने पापाराझींना सुनावलं. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी काजोलला ट्रोल करायला सुरूवात केली. जया बच्चन की छोटी बहन, असं म्हणत एका युजरने तिला ट्रोल केलं. किती हा अ‍ॅटिट्यूड, असं एका युजरने लिहिलं. बापरे, इतका अहंकार... स्टुपिड ते नाहीत, तू आहेस, असं एका युजरने तिला सुनावलं.याआधीही अनेकदा काजोल तिच्या अशा वागण्यामुळे ट्रोल झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी काजोल अशाच पद्धतीने ट्रोल झाली होती. काजोल एका कॅफेमधून बाहेर पडली आणि पापाराझींनी तिचे फोटो क्लिक करण्यासाठी सरसावले. पण काजोल त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, थेट आपल्या कारमध्ये जाऊन बसली होती. हा व्हिडीओही असाच व्हायरल झाला होता आणि यानंतरही तिला लोकांनी असंच ट्रोल केलं होतं.

काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा सिनेमा येत्या 9 डिसेंबरला रिलीज होतोय. यात काजोलने आईची भूमिका साकारली आहे. आजारी मुलगा आणि त्याच्या आईची कथा या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

टॅग्स :काजोलबॉलिवूड