Join us

अजय देवगणच्या आईला पाहिलंत का? काजोलनं शेअर केला सासू सोबतचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:15 IST

काजोल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Kajol: काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवडूचं लोकप्रिय कपल आहे. या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. हे दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकतंच काजोलनं तिची आई आणि सासूसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर  शेअर केला आहे. या फोटोंमधून काजोलचं आई आणि सासूबाईंशी असलेलं खास बॉन्डिंग दिसून आलंय. यानिमित्तानं नेटकऱ्यांना खूप दिवसांनी अजय देवगणच्या आईची झलक पाहायला मिळाली आहे. 

काजोलनं काल २७ जुलै रोजी तिची आई तनुजा आणि सासू वीणा देवगण यांच्यासोबत  "पेरेंट्स डे" साजरा केला. आई आणि सासुबाईंसोबतचा फोटो शेअर करत अभिनेत्रीनं लिहलं, "या दोघींनी माझ्यासाठी जे काही केलंय, त्यापुढे "पेरेंट्स डे" हे खूपच लहान वाटतो. तरीही हा पोस्ट करतेय. तुमचे खूप आभार". आई आणि सासूशिवाय काजोलन तिचे वडिला आणि सासऱ्यांनाही "पेरेंट्स डे"च्या शुभेच्छा दिल्यात.

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बॅक टू बॅक "माँ" आणि 'सरजमीन' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. "माँ" हा थिएटरमध्ये रिलीज झाला. तर 'सरजमीन' ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

टॅग्स :काजोलबॉलिवूडअजय देवगण