Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kajol : काजोल, तनीषाने आई तनुजाला भेट दिला करोडोंचा बंगला, VIDEO पाहून कौतुक कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 17:37 IST

Kajol, Tanisha, Tanuja : काजोल, तिची बहीण तनीषा आणि आई तनुजा या मायलेकींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. कारणही खास आहे....

काजोल (Kajol), तिची बहीण तनीषा ( Tanisha)आणि आई तनुजा (Tanuja ) या मायलेकींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. कारणही खास आहे. काजोल व तनीषा या दोघी बहिणींनी आई तनुजाला कोट्यवधीचा बंगला भेट दिला, त्याचाच हा व्हिडीओ.

गेल्या 8 महिन्यांपासून लोणावळ्यातील या बंगल्याचं काम सुरू होतं. अखेर हा बंगला बनून तयार झाला आणि काजोल व तनीषा आईला या बंगल्यात घेऊन गेल्या. दोन्ही लेकींनी दिलेलं हे खास सरप्राइज बघून तनुजा भारावून गेल्या.   व्हिडीओत तिघी मायलेकी बंगल्याची लाल फित कापताना दिसत आहेत. यावेळी तिघींच्याही चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. घरात प्रवेश करताच सर्वप्रथम तिघीही पायातील चपला बाहेर काढतात आणि मग आदराने जमिनीला स्पर्श करताना दिसतात. यानंतर आनंदात  काजोल बहिणीला मिठीही मारताना दिसते. 

तनीषाने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘-आणि आम्ही आईसाठी लोणावळ्यात घर घेतलं. तिला आठ महिने या घरापासून दूर ठेवलं...,’असं तिने व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.तनुजाला मुलींनी गिफ्ट दिलेल्या या बंगल्याला भलामोठा गेट आहे. लाकडापासून बनवलेलं घरातील फर्निचर, एलईडी लाईट्स, अंगणातील हिरवीगार झाडं सगळंच बघण्यासारखं आहे. 

1973 मध्ये तनुजा यांनी बंगाली दिग्दर्शक शोमू मुखजीर्सोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर काहीच वर्षांत दोघे वेगळे झालेत. पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. तनुजा मुलींसोबत अनेकदा मौजमस्ती करताना दिसतात. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी ज्वेलथीफ, दो चोर, मेरे जीवन साथी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.  

टॅग्स :काजोलबॉलिवूड