Join us

कभी खुशी कभी गम मधील ही मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्याची नात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 19:00 IST

कभी खुशी कभी गम मधील मालविका एका प्रसिद्ध अभिनेत्याची नात आहे तर तिची आत्या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

ठळक मुद्देमालविका ही जगदीश राज यांची नात असून अनिता राज ही प्रसिद्ध अभिनेत्री ही तिची आत्या आहे. 

कभी खुशी कभी गम या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात काजोल, शाहरुख खान, जया बच्चन, हृतिक रोशन, करिना कपूर आणि अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात छोट्या करिनाच्या भूमिकेत आपल्याला मालविका राज या बालकलाकाराला पाहायला मिळाले होते. याच मालविकाविषयी आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.

कभी खुशी कभी गम या चित्रपटातील छोटीशी पूजा प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ही पूजा म्हणजेच मालविका एका प्रसिद्ध अभिनेत्याची नात आहे तर तिची आत्या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकात आपल्याला अनेक चित्रपटात पोलिसांच्या भूमिकेत जगदीश राज यांना पाहायला मिळाले होते. डॉन, दिवार, मजदूर या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालविका ही जगदीश राज यांची नात असून अनिता राज ही प्रसिद्ध अभिनेत्री ही तिची आत्या आहे. 

जगदीश यांना अनिता, बॉबी आणि रूपा अशी तीन मुलं असून बॉबी यांची मुलगी मालविका आहे. मालविकाने कभी खुशी कभी गम प्रमाणेच जयदेव या दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटात देखील काम केले आहे. ती आता एक नायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचा स्क्वॉड हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग तिच्या नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

टॅग्स :बॉलिवूड