Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:01 IST

कभी खुशी गम फेम सर्वांची लाडकी अभिनेत्री आई होणार असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे

'कभी खुशी कभी गम' सिनेमात लहान 'पू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका राज लवकरच आई होणार आहे. तिने नुकतीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. मालविकाने पती प्रियांक मित्तलसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पतीच्या खांद्यावर उभी आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे, "एक नवीन अध्याय सुरू होत आहे... लवकरच आम्ही तीन होणार आहोत!"

मालविकाच्या आनंदाला उधाण

मालविकाने ही पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मालविकाने २०२३ मध्ये प्रियांक मित्तलसोबत विवाह केला होता. मालविका राजने 'कभी खुशी कभी ग़म' या चित्रपटात करीना कपूरच्या लहानपणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. मालविकाने ही गुड न्यूज देताच अनेक सेलिब्रिटींनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंटमध्ये तिचं अभिनंदन केलंय. 

लग्नाच्या २ वर्षांनी होणार आई

मालविका राजने बॉयफ्रेंड प्रणव बग्गासोबत टर्कीमध्ये साखरपुडा केला.  त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२३ मध्ये मालविकाने प्रणवसोबत लग्न केलं. मालविकाच्या लग्नाची खूप चर्चा झाली. मालविकाने काही वेब शो आणि सिनेमांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय सोशल मीडियावरही मालविका चांगलीच चर्चेत असते. लग्नाच्या २ वर्षांनी आई होणार असल्याने मालविका आणि प्रणव हे पती-पत्नी चांगलेच आनंदात आहेत. मालविकाच्या फोटोंवरुन पाहता येईल की, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

टॅग्स :मालविका राजप्रेग्नंसीगर्भवती महिलाबॉलिवूड