Join us

'ज्युनियर जी' आता काय करतो? इतका बदलला की ओळखू येणं शक्यच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:05 IST

सुपरहिरो 'ज्युनियर जी'चं पात्र साकारणाऱ्या बालकलाकाराने अनेकांची मनं जिंकली होती.

नव्वदच्या दशकात प्रसारित केल्या जाणाऱ्या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.  अशीच एक मालिका म्हणजे 'ज्युनियर जी'. 'ज्युनियर जी' या शोची लोकप्रियता इतकी जबरदस्त होती की, मालिका दूरदर्शनवर प्रसारित होताच मुलं आपली कामे सोडून टीव्हीसमोर बसायची. सुपरहिरो 'ज्युनियर जी'चं पात्र साकारणाऱ्या बालकलाकाराने अनेकांची मनं जिंकली होती.  त्या बालकलाकाराचं नाव होतं, अमितेश कोचर. 'ज्युनियर जी'मधून अमितेश कोचर घराघरात पोहोचला. जवळजवळ तीन वर्षे हा शो चालल्यानंतर तो अचानक बंद करण्यात आला, ज्यामुळे चाहते खूप दुःखी झाले होते. शो बंद झाल्यानंतर अमितेश टेलिव्हिजनवरून अचानक गायब झाला आणि त्यानंतर तो फारसा दिसला नाही. सध्याच्या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या काळात कुणाचीही माहिती काढणं पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालं आहे. 'ज्युनियर जी'च्या चाहत्यांनी अखेर अमितेश कोचरला शोधून काढलंचं. अमितेश कोचर हा सध्या काय करतो, याबद्दल आपण जाणून घेऊया. 

अभिनयाच्या दुनियेपासून वर्षानुवर्षे दूर असलेला अमितेश कोचर आता मोठा झाला आहे. अभिनयापासून दूर झालेल्या अमितेशने एक वेगळा मार्ग निवडला आहे. तो आता एक 'ट्रॅव्हल व्लॉगर' आहे. अमितेश स्वतःचा यूट्यूब चॅनल चालवतो. तो विविध ठिकाणी प्रवास करतो आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असतो. तो गेल्या चार वर्षांपासून यूट्यूबवर फारसा सक्रिय नाही आणि सोशल मीडियावरही तो खूप कमी दिसतो. तरीही, त्याचे प्रवास आणि व्लॉगिंगचे व्हिडिओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

'ज्युनियर जी' नंतर अभिनय का सोडला, याबद्दल अमितेशने एका यूट्यूब व्लॉगमध्ये भावनिक खुलासा केला होता. ज्युनियर जी शो बंद का झाला, हे त्याला माहीत नाही. त्याला फक्त एका फोन कॉलवर शो संपत असल्याचे कळवण्यात आले.शो बंद झाल्यावर त्याला काही ऑफर आल्या, पण त्याने त्या स्वीकारल्या नाहीत. कारण त्याला त्याच्या बोर्ड परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे होते. दुर्दैवाने, त्याच्या परीक्षेनंतर लगेचच त्याच्या आईचे निधन झाले. यानंतर त्याचं आयुष्य बदलून गेलं आणि तो अभिनयाच्या दुनियेपासून दूर गेला.

English
हिंदी सारांश
Web Title : Where is Junior G now? Unrecognizable transformation revealed!

Web Summary : Remember Junior G? Child actor Amitesh Kochhar, once a household name, is now a travel vlogger. He quit acting after his mother's death and focuses on his YouTube channel, though he's been inactive lately.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन