आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यांच्या सिनेमाची गेल्या वर्षापासूनच चर्चा आहे. याच सिनेमातून जुनैद पदार्पण करेल असंच बोललं गेलं होतं. पण जुनैदने 'महाराजा' सिनेमातून ओटीटीवर पदार्पण केलं. तर 'लव्हयापा' या सिनेमातून त्याने बिग स्क्रीनवर पदार्पण केलं. आता अखेर साई पल्लवीसोबतच्या त्याच्या सिनेमाची घोषणा झाली आहे. आजच सिनेमाचं पोस्टर आलं असून उद्या टीझर रिलीज होणार आहे.
'आमिर खान प्रोडक्शन'ने सोशल मीडियावर जुनैद आणि साई पल्लवीच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. 'एक दिन' असं सिनेमाचं नाव आहे. एक प्रेम, एक संधी असं पुढे लिहिलं आहे. जुनैद आणि साई बर्फात चालताना दिसत आहेत. दोघांच्याही हातात आईस्क्रीम आहे आणि चेहऱ्यावर हसू आहे. १ मे रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
'एक दिन' सिनेमा सुनील पांडे यांनी दिग्दर्शित केला आहे. सुनील यांनीच आमिर खान प्रोडक्शनचे आधीचे 'धोबी घाट' आणि 'देल्ही बेली' दिग्दर्शित केले होते. आता 'एक दिन' सिनेमातून जुनैद आणि साई पल्लवीची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जुनैद खानचा हा दुसराच सिनेमा असणार आहे. तर साई पल्लवीच्या 'रामायण' सिनेमाचीही जोरदार चर्चा आहे. त्यात ती रणबीर कपूरसोबत आहे.
Web Summary : Aamir Khan's son, Junaid, stars with Sai Pallavi in 'Ek Din,' a love story releasing May 1st. Poster unveiled; teaser drops tomorrow. Directed by Sunil Pandey.
Web Summary : आमिर खान के बेटे जुनैद, साई पल्लवी के साथ 'एक दिन' में, 1 मई को रिलीज होने वाली प्रेम कहानी में हैं। पोस्टर का अनावरण; टीज़र कल आएगा। सुनील पांडे द्वारा निर्देशित।