Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना तू धाडसी, निर्भय आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे, जुही चावलाचे ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 17:28 IST

कंगनावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

आज सगळीकडे कंगना रनौतचीच चर्चा होत आहे. चाहते किंवा सेलेब्रिटीज सर्वजण कंगनाचे कौतुक करीत आहेत. कंगना आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. आज त्याच्या बहुप्रतिक्षित दिवंगत जयललिता बायोपिक चित्रपटाचा ट्रेलर 'थलावी' लाँच झाला आहे. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकवला आहे. कंगानवर अभिनंदनाचा वर्षाव करतोय. बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलानेही सोशल मीडियावर कंगनाचे अभिनंदन केले.

जूही चावलाने तिच्या ट्विटर अकाउंटवर कंगना रनौतच्या 34 वा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन एक पोस्ट शेअर केली, 'कंगना तू एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस.  निडर, आणि प्रतिभाशाली मुलीचे खूप खूप अभिनंदन !!! आपण अमर्याद सर्जनशीलता क्षमता सकारात्मक दिशेने वापर. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा '. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तिला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वात आधी २००८ साली चित्रपट फॅशनसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०१४ साली क्वीन चित्रपटासाठी तिची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. २०१४ नंतर २०१५ साली कंगनाने पुन्हा एकदा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार तिला तनू वेड्स मनु रिटर्न्ससाठी मिळाला होता. आता चौथ्यांदा तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मणिकर्णिका चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

टॅग्स :कंगना राणौत